सोयाबीन, कापसासारखी तुरीची गत, केंद्राच्या या निर्णयावर दर अवलंबून
खरिपातील सोयाबीन आणि कापूस यांची आवक आता अंतिम टप्यात असून काही दिवसांपूर्वी तुरीची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. तुरीची आवक सुरु होताच तूर हमीभाव केंद्रे सुरु झाली होती. मात्र अनेकांनी हमीभाव केंद्रापेक्षा बाजारात तूर विक्री करण्याकडे जास्त भर दिला आहे. तुरीची आवक सुरु होऊन अनेक दिवस झाले मात्र अद्यापही तुरीच्या दरात वाढ झालेली नाही. यासाठी शेतकऱ्यांना जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत असेच काही घडले होते. सुरुवातीला दर चढे नव्हते मात्र नंतर सोयाबीन आणि कापूस अंतिम टप्यात असतांना दरात वाढ झाली आहे. तर आता त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्रीची घाई करू नये असा सल्ला कृषीतज्ञांनी दिला आहे.
ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज
उत्पादन घटले की, दरात वाढ होतेच
तुरीची आवक सुरु होऊन अनेक दिवस झाले असले तरी तुरीचे दर मात्र स्थिरच आहेत. सध्या उठाव नसल्यामुळे निर्यातदार अधिक प्रमाणात खरेदी करत नाहीयेत. भविष्यात तुरीचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. जर केंद्र सरकारने तुरीची आयात करण्याचा निर्णय घेतला तर मात्र तुरीचे सर्व गणित बिघडण्याची शक्यता आहे. असे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
ही वाचा (Read This ) पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२२, मिळणार ५० टक्के अनुदान
सध्याचे बाजारातील चित्र …
सध्या बाजारात दाखल झालेल्या तुरीच्या आद्रतेचे प्रमाण अधिक आहे. याचे कारण म्हणजे हंगामाच्या शेवटी अवकाळी आणि शेंग कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे सध्या बाजारात तुरीला ५ हजार ८०० ते ६ हजार ३०० असा दर आहे. तूर खरेदी केंद्रावर ६ हजार ३०० दर ठरवून दिला असला तरी नियम अटी यामुळे शेतकरी बाजारातच तूर विक्री करण्याकडे जास्त भर देत आहेत.
ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान