पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२२, मिळणार ५० टक्के अनुदान

Shares

शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक आहे ट्रॅक्टर. आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही की ते स्वतःच्या पैशाने ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रे खरेदी करू शकतील. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना ही आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू पी एम किसान ट्रॅक्टर योजना अंमलात आणल्याचे सांगितले जात आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत नवीन ट्रॅक्टर खरेदी करताना २० ते ५० टक्के अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाते.प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रकम जमा होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यासोबतच या बँक खात्यात आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज

लाभ कोणाला घेता येईल?
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील महिला शेतकऱ्यांना अधिक लाभ दिला जाणार आहे.पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर असावा. जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्यास ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी शेतकरी त्याच्या नावावर अर्ज करू शकत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

पात्रता

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असावी.
२. अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
३. अर्जाच्या पहिल्या ७ वर्षांसाठी, अर्जदार कोणत्याही सरकारी योजना, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभार्थी नसावा.

ही वाचा (Read This ) पशुपालन करणाऱ्यांना सरकार यासाठी देणार ७५ टक्के अनुदान

आवश्यक कागदपत्रे

१. जमिनीचे कागदपत्रे
२. बँकेचे पासबुक
३. आधार कार्ड
४. पासपोर्ट साईझ फोटो
५. मोबाइल नंबर

इथे अर्ज करा

https://agriwell.mahaonline.gov.in/

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *