या फळबागाचे योग्य नियोजन करून मिळवा वर्षभर उत्पन्न
सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असणारे तसेच आपल्याकडे लोकप्रिय असून केळी हे परवडण्यासारखे फळ असल्यामुळे शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही या फळाला कायम मागणी असते. शक्तिवर्धक म्हणून केळीचा आहारात आवार्जून वापर केला जातो. हवामानानुसार केळीच्या वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते. उतिसंवर्धन तंत्राचा वापर करून तयार केलेले केळीचे पीक वर्षभर केव्हाही घेता येते. परंतु तापमान फार जास्त किंवा फार कमी नसावे. केळी पिकास बाराही महिने मागणी असते.त्यामुळे याचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरते. आपण केळीविषयक अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ही वाचा (Read This ) PM-SYM : शेतकऱ्यांसाठीची काय आहे पेन्शन योजना, कसा करावा अर्ज?
जमीन व हवामान
१. केळी पिकासाठी सुपीक, कर्ब पदार्थांनी युक्त, भरपूर प्राणवायू असणारी तसेच भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असणारी जमीन उत्तम ठरते.
२. जास्त आम्लयुक्त आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये केळीचे पीक घेऊ नये.
३. पुरेशी कस असणारी आणि भुसभुशीत माती केळ्याच्या वाढीला उपयुक्त ठरते.
४. १८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात केळीची वाढ चांगली होते.
५. केळीच्या लागवडीपूर्वी त्या जमिनीवर हिरव्या भाज्या घ्याव्यात.
६. लागवड करण्यापूर्वी जमीन दोन-चार वेळा चांगली नांगरून घ्यावी.
७. लोखंडाचा नांगर, कुळपाच्या पाळ्या यांचा वापर करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी
८. जमिनीची मशागत करतेवेळी कंपोस्ट खत किंवा कुजलेले शेणखत घालून मिसळावेे.
९. महाराष्ट्रात जुन-जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर असे या पिकासाठी दोन हंगाम पिकासाठी चांगले ठरते.
ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान
भारतात घेतल्या जाणाऱ्या केळीच्या जाती
१. बुटकी तुकडेवाली
२. तंबाकू
३. रोबस्टा
४. मोनथान
५. पुवन नेंद्रन
६. लाल केळे
७. नयाली
८. सफेद वेलची
९. बनारसी
१०. रस्थाळी
११. अर्धपुरी
१२. कर्पूरवल्ली
१३. कर्दळी
१४. मोठी नैनी आदी
ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा
काय काळजी घ्यावी ?
१. केळीची पेरणी झाल्यावर लगोलग पाणी द्यावे.
२. केळी लागवडीतून साठी पाणी पुरवठा व्यवस्थित असावा.
३. खोडाजवळ पाणी साठून राहिल्यास मुळाजवळच्या मातीतील हवा उडून जाते आणि त्याचा परिणाम विकास आणि वाढीवर होतो.
४. केळी लागवडीतून त्यामुळेच खोडाजवळ पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. ५. केळीची मुळे फार नाजूक आणि संवेदनशील असल्याने त्यामध्ये आंतर पीक घेणे फारसे फायद्याचे ठरत नाही.
हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती
कापणी व उत्पादन
१. घडांची संख्या, आकारमान, त्याचे वजन, रंग, कोन आदी गोष्टी पाहून व्यापारी केळ्यांची खरेदी करावी कि नाही हे ठरवतात.
२. केळी लागवडीतून बाजारात केळीची किंमत त्याचा कच्चेपणा आणि पिकलेल्या गुणांवरून ठरते. ३. पेरणीनंतर ११ ते १२ महिन्यांत झाड कापणीसाठी तयार होते.
४. केळी लागवडीतून पहिले पुनर्पिक ८ ते १० महिन्यात कापणीसाठी तयार होते तर दुसर्या पुनर्पिकाला ८ ते ९ महिने लागतात.
५. ठिबक सिंचन पद्धतीच्या मशागतीत उतिसंवर्धन घेतल्यास केळ्याचे १०० टक्के प्रति उत्पादन घेता येते.
हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय