सोयाबीन साठवणुकीपेक्षा विक्रीवर भर? लवकरच उन्हाळी सोयाबीनचे आगमन
सध्या उत्पादनापेक्षा शेतमालाला किती दर आहे हे जास्त महत्वाचे आहे. कारण यावर शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. एकलगोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यात दरात होणारी सतत चढ उतार यामुळे आता आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना दरवाढीची मोठी अपेक्षा होती. परंतु हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला अगदी कवडीमोल दर होता. त्यांनतर दरात वाढ झाली होती मात्र आता पुन्हा दरात घट झाली आहे.
ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान
संयमाने घेतलेल्या निर्णयामुळे हंगामाच्या शेवटी शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
मागील काही दिवस सोयाबीनला ४ हजार ५०० रुपये दर होता आता तो दर ६ हजारावर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी टप्याटप्याने सोयाबीनची विक्री करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे अजूनही सोयाबीनची आवक सुरु आहे. मध्यंतरी दर कमी झाला होता तेव्हा दरात आता वाढ होईल की , नाही या भीतीने शेतकरी आहे त्या दरात सोयाबीन विक्री करावी की काय असा सवाल उपस्थित करत होते. मात्र शेतकऱ्यांनी संयमाने निर्णय घेऊन सोयाबीनची साठवणूक केली होती. आता दरात थोडी वाढ झाली असतांना शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सोयाबीनची मागणी अजूनही सुरु आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?
साठवणुकीपेक्षा विक्रीवर जास्त लक्ष केंद्रित करा ?
सुरुवातीपासून सोयाबीनला दर चांगला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणुकीवर जास्त भर दिला आहे. मध्यंतरी दरात चांगली वाढ झाली होती. तेव्हा शेतकऱ्यांनी अधिक दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीनची साठवुन केली होतो. मात्र त्यांनतर सोयाबीनला अगदी कवडीची दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे सोयाबीनची विक्री करावी की नाही असा प्रश्न पडला होता. मात्र त्यांनी आता पुन्हा टप्याटप्याने सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला.
मात्र आता उन्हाळी सोयाबीनचे लवकरच बाजारात आगमन होणार असून उन्हाळी सोयाबीनची आवक वाढल्यास त्यात घट होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी साठवणुकीपेक्षा विक्रीवर जास्त भर द्यावा असा सल्ला व्यापारी अग्रवाल यांनी दिला आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज