केळीच्या आवकात घट, दर मात्र स्थिर
केळी ( Banana) हे बाराही महिने घेतले जाणारे पीक असून खानदेशात या पिकाचे अधिक उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा खानदेशात केळीची आवक घटलेली दिसत आहे. बाजाराचे सर्वात महत्वाचे सूत्र म्हणजे एखाद्या पिकाची आवक घटली की त्याच्या दरात वाढ होते. परंतु केली पिकाच्या बाबतीत सर्व उलटं होतांना दिसून येत असून खानदेशात सध्या १७५ ट्रकने १६ टन सरासरी एवढी केळीची आवक होतांना निदर्शनास येत आहे तसेच केळीस प्रति क्विंटल प्रमाणे ४०० ते ७०० रुपये प्रमाणे दर मिळत आहे. वर्षभर वातावरणात (Weather) होणाऱ्या बदलाचा परिणाम केळी पिकावर झाला होता. केळीच्या दरातून या नुकसानीची भरपाई होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र केळीस मुबलक दर मिळत नसल्यामुळे बाजारपेठेत चिंताग्रस्थ वातावरण निर्माण झाले आहे. केळीचे दर्जेदार उत्पादन भेटूनही दर मात्र कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील आठवड्यातच जळगाव, चोपडा, जामनेर, धुळे, पाचोरा जिल्ह्यात केळीची काढणी पूर्ण झाली असून बाजारात केळी विक्रीस आली आहे.
हे ही वाचा (Read This) यासाठी मिळणार ९० टक्के अनुदान, अर्ज भरण्यास सुरुवात
केळीचे दर न वाढण्यामागील नेमके काय करणे आहेत ?
वातावरणामध्ये झालेल्या सततच्या बदलाचा परिणाम केळी पिकावर झालेला होता. त्याचबरोबर केली पिकावर करपा रोगाचा परिणाम झालेला दिसून आला त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अश्या अनेक संकटांचा सामना करून शेतकऱ्याच्या पदरी केळीचे काही प्रमाणात पीक पडले होते. मात्र त्याला योग्य असा दर मिळत नाहीये तर थंडीमुळे केळीच्या मागणीत घट होत आहे. भविष्यात केळीचे दर वाढतील की नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांना देखील पडला आहे.
केळीच्या दर्जानुसार मिळतोय का दर ?
शेतमालाच्या गुणवत्तेवर दर हा अवलंबून असतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरणाच्या बदलाचा परिणाम उत्पादनावर झाला असून खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या पिकास त्यांच्या दर्जानुसार दर मिळत आहे. चांगल्या केळीस ७०० तर रुपये प्रति क्विंटल तर कमी दर्जाच्या खराब झालेल्या केळीस २५० रुपये प्रमाणे दर मिळत आहे. वर्षभर उत्पादन घेतांना झालेला खर्च आणि केळीस सध्या मिळालेला भाव यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येत आहे. आता हा खर्च कसा भरून काढावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
केळीच्या दरात होणार सुधारणा ?
केळीचे पीक बाराही महिने घेता येत असल्यामुळे बाजारपेठेत केळी ही बाराही महिने सहज उपलब्ध होत असते. वाढत्या थंडीमुळे केळीची मागणी कमी झाली असली तरी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तापमानात वाढ झाल्यानंतर केळी पिकाची मागणी वाढेल अशी संभावना आहे. तापमान वाढीनंतर केळी निर्यातीमध्ये देखील वाढ होऊन दरात चांगली वाढ होईल अशी अपेक्षा केळी उत्पादकांना आहे.