कापसाला मिळाला सर्वोच दर, १० हजार ३३० रुपये !
कापसाच्या दराने केले १० हजार रुपये पार. कापसाच्या दरात मागील काही दिवसांपासून सतत थोडी थोडी वाढ होत होती. आता तर कापसाच्या दराने आकाश गाठले आहे असे म्हणता येईल. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत कापसाला १० हजार ३३० प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे अवकाळी, कमी उत्पादन, बोंडअळी यांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी तर कापसाचे वाढते भाव लक्षात घेता त्यास पांढरे सोने असे म्हंटले आहे.
हे ही वाचा (Read This ) हळदीला चढला सोन्याचा रंग, मिळाला सर्वोच दर !
शेतकऱ्यांच्या निर्णयाचा परिणाम कापूस दरावर झाला ?
सुरवातीला कापसाला चांगला दर मिळत होता त्यानंतर त्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र शेतकऱ्यांनी वेळोवेळी सावधपणे घेतलेल्या निर्णयांमुळे कापसाच्या दरात वाढ होत गेली. आता या दराने तर आकाशच गाठले आहे. कापसाचे दर कमी होताच शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली असून त्यांनी टप्याटप्याने त्याची आवक सुरु केली होती. शेतकऱ्यांनी या घेतलेल्या निर्णयाचा चांगला परिणाम कापूस दरावर झाला आहे.