हळदीला चढला सोन्याचा रंग, मिळाला सर्वोच दर !

Shares

काही दिवसांपूर्वी हळद ही शेतमालच नाही असा प्राधिकरणाकडून निर्णय देण्यात आला होता. या निर्णयाचा परिणाम हळदीच्या दरावर झाला होता. मात्र आता हळदीचा अधिकच पिवळा रंग चढला आहे. त्यामुळे हळदीच्या दरात आता चांगली वाढ झाली असून आठवड्यभरातच ही दर वाढ झाली आहे. महाराष्ट्रात हळदीचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. सांगलीमध्ये हळदीला सर्वोच्च दर मिळाला असून प्रति क्विंटल प्रमाणे चक्क ३ हजार ८५० रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर या हंगामातील सर्वाधिक दर मानला जात आहे.

शेतकऱ्यांना मिळाला थोडा दिलासा
हळद हा शेतीमाल नाही असे महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाने जाहीर करताच याचा परिणाम दरावर झाला होता. याचबरोबर हळदीच्या व्यापाऱ्यांवर ५ % जिएसटी (GST ) लागू करण्यात आलेला होता. यामुळे हळद दरामध्ये प्रति क्विंटल मागे १ हजार ८०० रुपयांनी घसरण झाली होती. आता शेतकऱ्यांना थोडासा धीर मिळाला असून सांगली बाजारपेठेमध्ये हळदीच्या दरात ३ हजार ८५० रुपयांची वाढ झाली आहे.

हे ही वाचा ( Read This ) केंद्राचा मोठा निर्णय, ‘झिरो बजेट शेती’ गावपातळीपर्यंत राबवणार.

लवकरच नवीन हळदीचा हंगाम सुरु होणार
महाराष्ट्रात सांगलीबरोबर परभणी, जालना, हिंगोली, जालना जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आता २ आठवड्यानंतर हळदीच्या नवीन आवकाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे अचानक दरात वाढ झाली आहे असे निदर्शनात येत आहे. बुधवारी हळदीला किमान ६ हजार तर कमाल १८ हजार रुपये क्विंटल असा दर मिळत होता. तसेच आठवड्यापूर्वी किमान दर ५ हजार तर कमाल दर ११ हजार ३०० रुपये असा होता. या वाढत्या दराचा शेतकऱ्यांना बराच फायदा झाला आहे.

हिंगोलीमध्ये सर्वाधिक हळद लागवड
हळद लागवडीमध्ये हिंगोली जिल्हा आघाडीवर असून हिंगोली बाजारपेठेमध्ये गुजरात, कर्नाटक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हळद निर्यात केली जाते. राज्यात ८४ हजार हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली असून यातील ४९ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या हिंगोली राज्यातील आहे. येथे हळदीचे योग्य व्यवस्थापन करून चोख व्यवहार सांभाळला जातो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *