इतर बातम्या

बाळाच्या जन्मासोबतच मिळणार आधार कार्ड ?

Shares

लवकरच नवजात बालकाचे जन्म प्रमाणपत्र येण्यापूर्वी त्यांचा आधारकार्ड नंबर येईल. नवजात बालकांना रुग्णालयातच आधार कार्ड जरी व्हावे यासाठी आधार कार्ड बनवणारी ऑथॉरिटी युआईडीएआई करत आहे. यासाठी रुग्णालयात नाव नोंदणी करणे लवकरच सुरु होईल. ही योजना लवकरच राबवली जाणार आहे.
९९.७ % प्रौढ लोकसंख्येचा आधार नोंदणी मध्ये समावेश केला आहे. आता आमचा नवजात बालकांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये नवजात बालकांना आधार क्रमांक देण्यासाठी बर्थ रजिस्टर करार करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक वर्षी साधारणतः दोन ते अडीच कोटी मुले जन्माला येतात, असे युआयडीएआय चे सीईओ सौरभ गर्ग म्हणाले आहे.
बाळाच्या जन्माच्या वेळी त्याच्या फोटोवर क्लिक करून आधार कार्ड दिले जाणार आहे. याचबरोबर गर्ग यांनी सांगितले कि ५ वर्षाखालील मुलांचे बायोमेट्रिक घेता येत नाही त्यामुळे ते त्यांच्या पालकांपैकी एकाशी जोडला जाईल. त्या मुलाने ५ वर्ष वय ओलांडल्यानंतर त्याचे बायोमेट्रिक घेण्यात येईल. आमच्या संपूर्ण लोकसंख्येला आधार क्रमांक देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मागील वर्षी आम्ही दुर्गम भागात जवळजवळ १० हजार शिबिरे राबवली होती. तिथे अनेक लोकांकडे आधार क्रमांक नसल्याचे सांगण्यात आले होते. या शिबिरात ३० लाख लोकांनी सहभाग घेतला होता. २०१० मध्ये आम्ही पहिला आधार क्रमांक जारी केला होता. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी हे आमचे लक्ष होते. दरवर्षी साधारणतः १० कोटी लोक त्यांचे नाव , पत्ता , मोबाईल क्रमांक उपडेट करत असतात. १४० कोटी बँक खात्यांपैकी १२० कोटी खाते आधाराशी जोडण्यात आले आहे, असे सौरभ गर्ग यांनी सांगितले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *