शेतकऱ्यांसाठी देशभरात उभारणार प्रयोगशाळा, केंद्रीय गृहमंत्री

Shares

शेतकरी अधिक उत्पादन व्हावे यासाठी रासायनिक खतांबरोबर विविध प्रयोग करत असतो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि जमिनीचे आरोग्य धोक्यात म्हणजेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे असे म्हणता येईल. उत्पादन वाढीच्या प्रयत्नांमध्ये जमिनीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे नैसर्गिक शेती काळाची गरज झाली आहे. अनेक शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत आहे मात्र हा आकडा अपेक्षे एवढा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीकडे कल वाढावा यासाठी तसेच नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य माहिती असणे, प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते. नैसर्गिक शेतीची माहिती शेतकऱ्यांना व्हावी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी देशभर स्वतंत्र प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहे. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहने सांगितले आहे.
या प्रयोग शाळेची महत्वाची भूमिका अशी आहे की शास्त्रोक्त पद्धतीने शेती करणे. या प्रयोगशाळेमध्ये पाण्याचे नमुने, मातीचे परीक्षण तसेच पिकांचे मूल्यमापन अश्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. कृषी क्षेत्रावर आपल्या भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था टिकून राहावी यासाठी केंद्र शासन नेहमी प्रयत्न करत असते. यासाठी केंद्रसरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच नैसर्गिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच जमिनीचे आरोग्य टिकून राहावे यासाठी देशभर प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *