हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी करा मुळाचे सेवन !
मुळ्याची भाजी , सलाड म्हणून वापरला जातो. अनेक जण पोषक असणारा मुळा खाणे टाळत असतात, कारण मुळा खाल्ल्यानंतर ढेकर तसेच तोंडातून दुर्गंधी येते. परंतु मुळामध्ये उपलब्ध असलेले घटक अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. हिवाळ्यात पांढऱ्या मुळाचे सेवन केल्यास आरोग्य सुधारते. मुळ्यामध्ये अ , ब ,क जीवनसत्वे, लोह, सल्फर, सोडियम, क्लोरीन, आयोडीन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आपण आज मुळाचे फायदे जाणून घेणार आहोत.
मुळा खाण्याचे फायदे –
१. हिवाळ्यात मुळ्याचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते. मुळ्याच्या अँटी ऑक्सिडेन्ट गुणधर्मामुळे हृदय निरोगी राहते.
२. मुळ्यामधे पोटॅशिअम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
३. हिवाळ्यात मुळा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो.
४. हिवाळ्यात सर्दी , खोकल्यावर मुळा हा उत्तम पर्याय आहे.
५. मुळ्यामधे फायबरचे प्रमाण जास्त असते,. त्यामुळे कच्चा मुळा पित्तावर अत्यंत गुणकारी ठरतो.
अश्या गुणी मुळ्याचे हिवाळ्यास सेवन केल्यास निरोगी राहण्यास मदत होते.