इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

शेळीपालन,कुक्कुटपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, असा करा अर्ज ३१ मार्चपूर्वी

Shares

सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत काम करते तर शेतीबरोबर जोडधंदा करून अधिकचा नफा मिळावा यासाठी नवनवीन योजना, कार्यक्रम राबवत असते. अशीच एक योजना सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरु केली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६० % अनुदान देण्यात येणार आहे.

शेतमाल शेळ्या मांस व दूध आणि परसबागेतील कुक्कुटपालन अंडी यांच्या मूल्य साखळी विकासाच्या व प्रकल्पासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ असून तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

हे ही वाचा (Read This ) या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

२०२० पासून राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजना प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत कुक्कुटपालन (Poultry Farming), वाहतूक, शेळीपालन (Goat Rearing), दूध (Dairy), साठवणूक, शेतमाल, यांच्या संदर्भातील मूल्य साखळी विकासाचे जे काही व्यवसाय असतील त्या व्यवसायासाठी ६० टक्के अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

अर्ज कुठे आणि कसा करावा ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल.
  • तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
  • तुम्हाला अधिकृत वेबसाइट वरून अर्जाची प्रिंट काढावी लागेल. त्यास आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून शेतकरी उत्पादक कंपनी जिल्हाच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, प्रभाग संघानी जिल्हा अभियान व्यवस्थापक यांच्या कार्यालयात सादर करावा लागेल.
  • तुम्ही जर ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करण्याची गरज नाही.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक स्टेटमेंट

हे ही वाचा (Read This ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – शेत-शिवाराचे होणार कायापालट, 75% मिळणार अनुदान

अधिकृत संकेतस्थळ

https://www.smart-mh.org/

अर्जाचा नमुना

https://www.smart-mh.org/images/ApplicationForm-and-MoU-Form.pdf

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *