आपल्याकडे ही घेता येते लवंगाचे पीक, अशी करा लागवड
भारतामध्ये अनेक मसाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर मसाला पिकांमध्ये उच्च दर्जाचे स्थान असलेले पीक म्हणजे लवंग. लवंग पदार्थांची चव वाढवते तर पदार्थांना चमचमीत, लज्जतदार अशी चव येते. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये हे पीक प्रामुख्याने घेतले जात असले तरी. महाराष्ट्रात देखील हे पीक घेता येते.
लवंगला मसाला पिकांमध्ये महत्वाचे स्थान आहे. तर यास मागणी ही बाराही महिने मोठ्या प्रमाणात होत असते. अनेक औद्योगिकरण उत्पादनामध्ये लवंग तेलाचा वापर केला जातो. तसेच औषधे, टूथपेस्ट, साबण, अत्तरे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
हे ही वाचा (Read This ) या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न
लवंग कशी तयार होते?
- लवंग म्हणजेच झाडावरची कळी होय.
- कळ्या पूर्ण वाढल्यानंतर त्यांची काढणी करून त्या उन्हात वाळवतात. ती पूर्ण नीट वाळल्या नंतर लवंग तयार होते.
- कळ्या तश्याच वाढू दिली तर त्यांपासून फुल तयार होते.
जमीन व हवामान
- लवंग उष्णकटिबंधातील झाड आहे.
- लवंगाचे पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते.
- उत्तम निचरा करणारी तसेच सेंद्रिय पदार्थांनी भरपूर असलेली जमीन मानवते.
- लवंग पिकास उष्ण दमट हवामान मानवते.
- जास्त ऊन असेल तर उष्णतेमुळे पाने व खोड करपण्याची जास्त शक्यता असते.
- समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत ते येऊ शकते.त्यामुळे या पिकासाठी सावली महत्वाची असते.
- २० ते ३० अंश सेंग्रे. तापमान १५०० ते २५०० मिमी. पाऊस आणि ६० ते ९५ टक्के आर्द्रता या पिकास चांगली मानवते.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
लागवड
- लवंगाची लागवड अश्या ठिकाणी करावी जिथे त्यांना सावली मिळेल तसेच त्यांचे वाऱ्यापासून संरक्षण होईल.
- लवंगाची लागवड ही नारळ किंवा सुपारीची बाग, पूर्वेस उतार असलेल्या डोंगरउतारावर तसेच दोन डोंगरांच्या दरीतील प्रदेशात पाणीपुरवठ्याची सोय असणाऱ्या ठिकाणी केल्यास जास्त मानवते.
- सुपारी तसेच नारळ बागेत लवंगाची लागवड करतांना योग्य अंतर ठेवणे गरजेचे आहे.
- लवंगाचे पीक हे आंतरपीक म्हणून घेता येते.
- लवंगाची लागवड करतांना खड्डे करून त्यात शेणखत मिसळावेत.
पाणी व्यवस्थापन
- लवंग पिकाला पाणी देतांना जमीन सतत ओली राहील मात्र दलदल होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
- दलदल निर्माण झाल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते.
- एकाच वेळी भरपूर पाणी न देता थोडे थोडे पाणी द्यावे.
- जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी रोपाभोवती 45 ते 60 सेंमीपर्यंत पालापाचोळ्याचे अच्छादन करावे.
- लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप उपयोगात आणलेले असल्यास लागवड केल्यानंतर ४ ते ५ वर्षात लवंगाच्या झाडाला फुले येऊ लागतात.
- फुले दोन हंगामात येतात. फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान पहिले आणि प्रमुख उत्पन्न मिळते तर दुसरेसप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मिळते.
हे ही वाचा (Read This हा ज्यूस ३ तासात डायबेटीस रुग्णांची शुगर करेल कंट्रोल, तज्ज्ञांचा सल्ला
काढणी व उत्पादन
- कळीचा अंकुर दिसायला लागल्यापासून ५ ते ६ महिन्यांत कळी काढण्यासाठी तयार होते.
- गुच्छातील सर्व कळ्या एकाच वेळी काढण्यासाठी तयार होत नाहीत.
- कळ्यांचा घुमट पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारिंगी रंग प्राप्त होतो. अशाच कळ्यांची काढणी करावी आणि त्या उन्हात वाळवाव्यात.
- साधारणपणे ४ ते ५ दिवसात कळ्या वाळतात.
- लवंगाच्या १५ ते २० वर्षांच्या झाडापासून २ ते ३ किलो वाळलेल्या लवंगा मिळतात
कोकणात अनेक भागांमध्ये लवंग लागवड केली जाते
हवामानातील साधर्म्यामुळे केरळप्रमाणेच महाराष्ट्रातील कोकण विभागात लवंग लागवडीस चांगलाच वाव आहे.
कोकण कृषी विद्यापीठाने विद्यापीठांतर्गत असणार्या विविध संशोधन केंद्रावर लवंगेची लागवड केली जाते आणि त्यामध्ये पीकांची वाढ आणि उत्पन्न समाधानकारक असल्याचे दाखवून दिले आहे.
त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाबरोबरच कोकणातील जिल्हा परिषदा शेतकर्यांना लवकर लागवडीसाठी प्रात्साहन देत आहेत.