येत्या दोन दिवसात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता ?
सप्टेंबर महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्ती पाऊस झाला असून येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा पावसाला सुरवात होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले. बंगालच्या उप सागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रमध्ये पाऊस होऊ शकतो. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड,हिंगोली या जिल्ह्याना येल्लो अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भतील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, अमरावती, वाशीम या जिल्ह्यात येल्लो अलर्ट सांगितला आहे.त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रमधील नाशिक, धुळे आणि जळगांव या जिल्ह्यात हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केला आहे.
ही सर्व माहिती हवामानतज्ञ के. एस होसालीकर यांनी आपल्या ट्विटर वरून दिली आहे.