फलोत्पादन

व्वा रे पठ्या ७० दिवसात घेतले १०० टन टरबुजाचे उत्पन्न, ४ एकरातून मिळवले १० लाख

Shares

तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने शेती केली तर हमखास परवडू शकते, हे देवळा तालुक्यातील खामखेडा येथील तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. या भागात बागायत जमीन मोठ्या प्रमाणात आहे.


तरीही या भागातील शेतकरी मका, कापूस आणि भाजीपाला जागवड करण्यास प्राधान्य देत असतो. एका तरुण शेतकऱ्याने चार एकर शेतीत केवळ दोन ते अडीच महिन्यात १०० टनपेक्षा जास्त टरबूज उत्पादन घेतले आहे.यातून या तरुणाला १० लाख रुपयांची कमाई झाली आहे. विशाल बच्छाव या तरुण शेतकऱ्याने स्वतःची तीन एकर शेतीसह चुलत्यांची चार एकर शेती वाटय़ाने करावयास घेतली आहे. तीन वर्षांपासून ते टरबूज तसेच भाजीपाला पीक घेतात.

कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर नेहमी मागणी असलेल्या काळ्या मिरीची लागवड करा.

मागील वर्षी विशालला टरबूजाचे उत्पन्न चांगले झाले होते, मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे व्यापार ठप्प होता याची आर्थिक झळ त्याला सहन करावी लागली. यंदा विशालने  फेब्रुवारीत िठबक सिंचनाचा उपयोग करून आणि रोपांऐवजी बियाणे टाकत चार एकर क्षेत्रात लागवड केली होती.

पाणी आणि फवारणीचे योग्य नियोजन केल्याने पीक देखील वेळेत बहारदार आले, अलीकडेच टरबूज पिकाची काढणी सुरू झाली असून चार एकर क्षेत्रात आजपर्यंत १०० टन टरबूज निघाले आहेत. अजून १५ ते २० टन चांगल्या प्रतीचा माल निघण्याची शक्यता असून दुय्यम माल देखील १० टनापर्यंत निघेल, असा अंदाज विशालने व्यक्त केला.

ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !

सटाणा येथील व्यापारी टरबूज जम्मू काश्मीर येथे विक्री करत असतात, त्यामुळे विशालने पिकवलेले टरबूज देखील जम्मू काश्मीर पर्यंत पोहचले आहेत.
पीक नियोजनात गावातील शेतकरी मित्र तसेच परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीस भेट देत विशाल यांनी टरबूज पीक चांगल्या प्रकारे कसे काढता येईल, हे अभ्यासले. शेतीतील सर्व कामे कुटुंबातील सदस्य आई, वडील, भाऊ आणि स्वत:च्या देखरेखीखाली आवश्यक तेथे मजुरांची मदत घेत केले.

टरबुजाटून दहा लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन

तंत्रज्ञानाचा वापर करून विशाल यांनी चार एकरात टरबूज फळपिकाची लागवड करून तब्बल १० लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसाठी  नवा आदर्श निर्माण केला आहे. टरबूजचा दर्जा आणि गोडवा चांगला असल्याने पहिल्याच तोडणीत १०० टन टरबूज १० रुपये किलो दराने व्यापाऱ्याने खरेदी केले. आदर्श टरबूज लागवडीपासून ते उत्पन्न निघेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेण्यात आल्याने भरघोस उत्पन्न निघाले.
अतिशय कष्टाने शेतीत झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि पिकाची सखोल अभ्यासपूर्ण माहिती यामुळे विशालने यशस्वी टरबूज उत्पादन घेतले असून त्याच्या कष्टाची ही पावती आहे . अशी प्रतिक्रिया कैलास बच्छाव यांनी दिली. 

हेही वाचा :- पैसे न दिल्याच्या कारणाने, मुलाने केला पित्याचा खून

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *