हर हर महादेव, सोयाबीन दराबरोबर आवक मध्ये तेजी !
गेल्या काही दिवसांपासून कृषी क्षेत्रात सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याची चर्चा सुरु आहे. सोयाबीनच्या वाढत्या दराने बाजारातील सर्व समीकरणे बदलून टाकली आहेत.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा भाव एका क्विंटलमागे ७ हजार ३०० रुपयांवर गेला असून सोयाबीनची १८ ते २० हजार गोण्यांची आवक थेट ३० हजार गोण्यांवर गेली आहे.असे असतानाही भविष्यात अधिक दर मिळण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.त्याच तज्ज्ञांनी म्हणा आता या दराने सोयाबीन विकायचे की साठवायचे याचा निर्णय शेतकरी घेणार हे पाहावे लागेल.
हे ही वाचा (Read This ) लाल पत्ताकोबीच्या मागणीत वाढ, मिळवून देईल अधिकच नफा
शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय ठरला फायदेशीर
सोयाबीनचे अपॆक्षेप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मागील ४ महिन्यांपासून सोयाबीन साठवून ठेवला होता. आता मात्र दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी काढला आहे.
हे ही वाचा (Read This ) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता साठवणूक करून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा अधिक प्रमाणात फायदा होत आहे.सध्या समाधानकारक दर असल्याने आता साठवणूकीतले सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहे त्यामुळे सोयाबीनच्या आवक मध्ये वाढ झाली आहे.