रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाचे भाव गगनाला भिडणार?
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे या देशातून होणारी गहू निर्यात थांबली आहे. युक्रेन , रशिया मधून युरोप , आफ्रिकेला गहू तसेच इतर अन्नधान्य निर्यात केले जाते. मात्र आता युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्यामुळे पर्याय म्हणून भारतातील गव्हाला मोठी मागणी होत आहे.
काही दिवसातच भारतातून जवळजवळ ५ लाख टन गहू खरेदीसाठी करार केले गेले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गहू, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे धान्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताकडे सर्व लक्ष वेधून आहेत.
जागतिक बाजारातील किमतीतील वाढीमुळे भारतीय पुरवठादारांना गव्हाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे सोपे झाले आहे, असे एका जागतिक ट्रेडिंग फर्ममधील एका डीलरने सांगितले आहे.
भारतातून गव्हाची विक्रमी निर्यात
युक्रेन आणि रशियाकडून पुरवठा खंडित झाल्यामुळे खरेदीदार भारताकडे वळले आहेत. केवळ भारतच गव्हाचा मोठा, स्थिर पुरवठादार करु शकतो आणि म्हणूनच ते भारताकडे वळले आहेत. त्यामुळे भारत यंदा ७० लाख टन विक्रमी गहू निर्यात करणार आहे.
गव्हाच्या दरामध्ये वाढ ?
गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातून गहू २४०० रुपये प्रति क्विंटल ते २४५० रुपये प्रति क्विंटल दराने निर्यात केले जात आहे. गव्हाच्या किमतीमध्ये २० टक्क्याने वाढ झाली आहे.
सरकारी गोदामांमध्ये मुबलक प्रमाणात धान्यसाठा उपलब्ध असल्यामुळे सध्या गव्हाच्या किमतीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता नाही, असे कृषी आणि खाद्य तज्ञ देवेंद्र शर्मा यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !