रोग आणि नियोजन

तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापण

Shares

किटकशास्त्र विभागात दर महिन्याच्या दि. १ व १६ ला विदर्भातील सर्व जिल्हयातील किटकशास्त्रज्ञांची पिकावरील किड परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात येत असते. या बैठकीत विदर्भातील सर्व संशोधन केंद्र व कृषि महाविद्यालय येथील कार्यरत किटकशास्त्रज्ञ त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यात तेथील कृषि अधिकान्यासमवेत सर्वेक्षण करून किड परिस्थितीबाबत माहिती सादर करतात नुकत्याच दि. १६/१०/२०२० रोजी विदर्भातील सर्व किटकशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन आढावा सभेतील चर्चेनुसार यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनत ओल आहे, त्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे काही ठिकाणी कळी किंवा फुलोऱ्यावर अवस्थेत आहे. शेतकरी बंधुना तूर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे मात्र मागील आठवडयात असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पाखरणान्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणान्या अळयापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहनी करुन वेळीच व्यवस्थापनावे उपाय करणे आवशक आहे. शेंगा पोखरणा या अळ्यांमधे खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेष होतो.
शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव):-
या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळया तूरीच्या कळया आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करडया रेषा असतात. मोठया अळया शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.
२. पिसारी पतंग :- या पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते..
३. शेंगे माशी :- या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

  • एकात्मिक व्यवस्थापणः
    या तिनही किडी कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.
  • १. प्रति हेक्टर २० पक्षीयांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतात.
  • २. पहिली फवारणी (१० टक्के फुलोरावर असतांना) निंबोळी अर्क५टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा एच.ए.एन.पि.व्हि (१x१०’पिओबी/
    मिली) 400 एल.ई./हे. किंवा बोसिलस थुरिनजिसिस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी.,२० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • ३. दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानी) झंगामेक्टीन बेझोएट ५ टक्के ३एस जी डॉम किंवा लॅण्डा सायहॅलोमेट्रीन ५टक्के प्रवाही १० मिली किंचा क्लोरॅनट्रॅनीलिपोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही
    २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
  • ४. अळयांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे. त्यामुळे  झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात.
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *