सोयाबिनवरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

Shares

जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयातील पाऊस मानानंतर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे त्यांचे पिक सदयस्थितीत २५ ते ३० दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. अमरावती व नागपूर जिल्हयातील काही तालुक्यामधे या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केल आहे अश्या सोयाबीन पिकावरसुध्दा पुढील काही दिवसात या किडीच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भावाची सध्दा शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन शेतकरी बंधुंनी जागरूक राहून खालील प्रकारेया किडींचे व्यवस्थापन करावे.

किडीची ओळख व नुकसान:
खोड माशी लहान, चमकदार काळया रंगाची असुन त्यांची लांबी २ मि.मि. असते. अंडयातुन निघालेली अळी पाय नसलेली,फिक्कट पिवळ्या रंगाची , २-४ मि.मि. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळीनंतर पानाचे देठातुन झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहील्यास पांदूरक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठया प्रमाणात नुकसान होते. खोडमाशीची अळी तसेचकोष फांद्यात, खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वनज कमीहोऊन उत्पादनात १६-३० टक्के घट होते.
चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर,फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणत: एकमेकांपासून १ ते १.५ से.मी.अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल (चक्र) काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामूळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंडयातून निघालेली अळी पानाचे देट अणि फांदीतून आत जाते, मुख्या खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव हया किडीचा प्रादुर्भाव मुंग, उडीद,चवळी या पिकावर सुध्दा होवू शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांदया व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारणत: दिड महिण्याचे झाल्यावर चक्र भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही, पण किड ग्रस्त झाडास कमीशेंगा लागतात परिणामी उत्पादनात घट येते.
व्यवस्थापन:
पिवळे चिकट सापळे लावून नियमित माशांचा प्रादुर्भाव पाहणे (२५/हे.).
खोडमाशी व चक्रीभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
रासायनिक किटकनाशकांचा वापर
• खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थीक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतर (सरासरी १०टक्के किडग्रस्त झाडे ) या दोन्ही किडींचे नियंत्रणासाठी इथियॉन ५० टक्के-३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के-६.७ मिली किंवा क्लोरॅट्रेनिप्रोल १८.५ टक्के-३.० मिली किंवा थायोमेथोक्झाम १२.६ टक्के+ लॅब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के डोडसी टक्के- २.५० मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *