तूर पिकावरील धोकादायक कीड मारूका !
भारतात तूर हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. बहुतांश लोक तुरीचा उपयोग आपल्या रोजच्या जेवणात करतात. बदलते वातावरण पाहता तूर पिकाची काळजी घेणे गरजेचे ठरत आहे. तुरीचे पीक शेंग पोसण्याच्या अवस्थेत असतांना त्यावर मारूका किडीचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. आपण आज या मारूका किडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मारूका किडीचे लक्षणे –
१. मारूका कडधान्य पिकांची पाने गुंडाळून शेंगा पोखरतात.
२. या किडींच्या पंखावर पांढरे पट्टे असतात तर पतंग करड्या रंगाचा असतो.
३. या मादी शेंगा , फुले , कळ्यांवर अंडी घालतात.
४. ही अंडी पांढरी तसेच अर्धपारदर्शक असते.
५. अंड्यामधून अळी बाहेर निघाल्यानंतर कळ्या, फुले खातात.
६. या अळ्या फुले , कळ्या , शेंगा यांना एकत्र चिटकवून झुपके तयार करतात.
७. या अळ्या मोठ्या झाल्यानंतर शेंगातील आतील दाणे खातात.
८. या अळीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसात पूर्ण होतो.
९. या अळ्या शेंगाच्या झुपक्यात किंवा मातीत कोषावस्थेत जातात.
मारूका किडीचे व्यवस्थापन –
१. शेतात प्रति मीटर २० ते २५ जागी कीटकनाशकाची फवारणी करावीत.
२. थायोडीकार्ब ७५ डब्लूपी २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावीत.
३. ही फवारणी स्प्रेने करावीत.
४. गरज भासल्यास पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावीत.
५. कीटनाशकांसोबत इतर बुरशीजन्य , कीटकनाशके , खते , अन्नद्रवे मिसळू नयेत.
अश्याप्रकारे मारूका किडीचे नियंत्रण वेळीच केले गेले पाहिजे. जेणेकरून उत्तम , निरोगी पीक येण्यास मदत होईल तर उत्पादनात जास्त प्रमाणात येईल.