तुरीच्या दरात वाढ, तूर हमीभाव केंद्रावर शुकशुकाट
राज्यात १० दिवसांपासून तूर हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र केवळ १० दिवसांसाठीच हे केंद्र सुरू केले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. याचे कारण म्हणजे तूर हमीभाव केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारपेठेमध्ये तुरीचे दर जास्त असल्यामुळे शेतकरी आता थेट बाजारपेठेत जाऊन तुरीची विक्री करत आहेत. तूर हमीभाव केंद्र शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना चांगली किंमत मिळावी यामुळे सुरू करण्यात आले होते. मात्र हमीभाव केंद्रात शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे तुरीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असला तरी अडीच हजार क्विंटल तुरीची आवक होताना दिसून येत आहे.
हे ही वाचा (Read This) PM किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर असा मिळवा 31 मार्चपर्यंत.
हमीभाव केंद्रापेक्षा बाजारपेठेकडे शेतकऱ्यांचा जास्त कल…
तूर हमीभाव केंद्रामध्ये तुरीला ६ हजार ३०० तर लातूर बाजारपेठेत ६ हजार ५०० असा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रापेक्षा थेट बाजारात तुरीची विक्री करत आहेत. तसेच हमीभाव केंद्रात तूर नेतांना कागदाची पूर्तता, येण्या जाण्यासाठी अधिकचा खर्च तसेच त्यासाठी लागणारा वेळ देखील वाचत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रापेक्षा बाजारपेठेत तूर विक्री करणे अधिक सोईस्कर वाटत आहे.
जुन्या तुरीला जास्त दर मागणीसह जास्त दर …
बदलत्या वातावरणामुळे तुरीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असला तरी अडीच हजार क्विंटल तुरीची आवक होताना दिसून येत आहे. तुरीचा सध्या दर ६ हजार ५०० रुपये असा सुरू असला तरी जुन्या तुरीस जास्त प्रमाणात मागणी असल्यामुळे त्यास १००-२०० रुपयांनी जास्त भाव मिळत आहे. कारण जुनी तूर चांगली वाळलेली असून त्याचा दर्जा देखील उत्तम आहे.