शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – कधी नव्हे ते गायीच्या दूध दरात वाढ, मात्र उत्पादन घटले !

Shares

दिवसंदिवस महागाई वाढत असून त्याचे परिणाम दैनंदिन गरजांवर होतात, पुणे जिल्हाती कात्रज येथील सहकारी दूध उत्पादक संघाने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर आणखी दोन रुपयांनी वाढवला आहे. मागील २१ दिवसात हि तिसर्यांदा दरवाढ झाली असून शेतकर्यांना याचा फायदा होताना दिसते.  सोमवार पासून या निर्णया नुसार कात्रज डेअरी प्रतिलिटर ३५ रुपय या दारात दुध खरेदी करणार असून,  इंधन दरवाढ, पशुखाद्यात झालेली दरवाढ आणि उन्हामुळे झालेली दुध उत्पादनाची घट या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असे कात्रज सहकारी दूध उत्पादक संघाकडून सांगण्यात आले. दरम्यान,जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत केशरताई पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरमागे त्यांनी 2 रुपये वाढवून तो 33 रुपयांऐवजी 35 रुपये इतका देण्याची मोठी घोषणा केली. आता या नव्या निर्णयाची अंमलबजावणी 11 एप्रिलपासून होणार आहे.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

 केशरताई पवार या तीन दिवसापूर्वी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्याअध्यक्षपदाची नियुक्त झाल्या यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, यांनी हि दरवाढीची घोषणा जुन्नर येथील एका सत्काराच्या कर्यक्रमात केली, त्यांनी २ रुपयांनी हि दिर्वाढ घोषित केली, ३३ रुपय प्रतीलिटर वरून दुध आता थेट ३५ रुपयाने घेतले जाणार असे त्यांनी यावेळी सांगितले,   येत्या 11 एप्रिलपासून या वाढत्या दरांची अंमलबजावणी  होणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

मागील तीन आठवड्यातील ही तिसरी दरवाढ आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर, आणि दूध उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान,जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत केशरताई पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरमागे त्यांनी 2 रुपये वाढवून तो 33 रुपयांऐवजी 35 रुपये इतका देण्याची मोठी घोषणा केली.

हे ही वाचा (Read This ) उन्हाळी सोयाबीनला शेंगा लागत नाहीये, दोष कोणाचा?

दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असली तरी पुणे शहरातील दूध विक्री दर मात्र आहे तेच राहणार आहेत. दुधाची तूट भरून काढण्यासाठी विविध दूध संस्थांमध्ये दूध खरेदी दर वाढीची स्पर्धा लागल्याचं दिसतंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याच संस्थेला दूध द्यावे, या उद्देशाने खासगी आणि सहकारी दूध संघांनी खरेदी दर वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच दूध खरेदी दरात कधीही प्रतिलिटर 30 रुपयांच्या वर न जाणाऱ्या दूध संघांनी देखील खरेदी दर 35 रुपयांपर्यंत नेले आहेत.

हे ही वाचा (Read This या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *