शेतकऱ्यांपुढे प्रश्न कांद्याची लागवड करावी की नाही? येवल्यात २०० रुपये क्विंटल दर, जाणून घ्या आजचे दर
कांद्याच्या दरात चढ उतार होणे हे शेतकऱ्यांसाठी काही नवीन नाही. मात्र यंदा कांद्याच्या दराला उतरती कळा लागली आहे. महिन्याभरापूर्वी कांद्यास ३ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होते. तर आता हे दर थेट २०० रुपये प्रति क्विंटलवर आले आहे.
अजून उन्हाळी हंगाम सुरु झाला नसून कांदा दराचे चित्र हे झपाट्याने बदलतांना दिसत आहे.लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे ४२५ रुपयांची घसरण झाली आहे. तर आता भविष्यात हे दर कुठपर्यंत जातील हे सांगता येत नाही.
हे ही वाचा (Read This ) हायब्रीड कारले लागवडीतून घ्या भरगोस उत्पन्न
कांद्याचे आजचे दर

दरात वाढ होण्याची कारणे
राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश येथे कांद्याची आवक ही मोठ्या संख्येने होत आहे. तर पश्चिम बंगाल मध्ये नवीन लाल कांद्याची आवक वाढली आहे. तर महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहमदनगर भागात नवीन उन्हाळी कांद्यासह लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम थेट कांद्याच्या दरावर होत आहे.
कांद्याची मागणी कमी तर आवक जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. साधारणतः दीड महिन्यापूर्वी आवक जास्त असून देखील दर चांगले होते. त्याचे कारण म्हणजे तेव्हा केवळ खरिपातील कांदा विक्रीस होता. मात्र आता उन्हाळी कांद्याची देखील आवक होत आहे.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
कांद्याच्या दरात कसे झाले बदल ?
कांद्यास शनिवारी १ हजार २६७ वाहनातून २२ हजार ४५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर कमाल १५५१ रुपये आणि किमान ५०० रुपये व सर्वसाधारण १३०० रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला होता. सोमवारी ९०० वाहनातून ३२ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाला. त्याला कमाल ११८० रुपये, किमान ४०० रुपये तर सर्वसाधारण ८७५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता.
हे ही वाचा (Read This ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – शेत-शिवाराचे होणार कायापालट, 75% मिळणार अनुदान
वातावरणाचा कांदा पिकावर परिणाम
मागील आठवड्यात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी मुळे शेतकऱ्यांनी काढणी, छाटणी आणि लगेचच विक्री केली होती. कारण दर कमी मिळाला तर चालेल मात्र पिकांचे नुकसान नाही झाले पाहीजे अशी शेतकऱ्यांची भूमिका होती. कांद्याची आवक ही वाढली असून त्याचा परिणाम दरावर होतांना दिसून येत आहे. त्यात उन्हाळी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे आता आवक मध्ये अधिक वाढ झाल्यास काय चित्र असेल हे उद्याच कळेल.