फलोत्पादनबाजार भाव

डाळिंबला मिळतोय सफरचंदपेक्षा जास्त भाव !

Shares

यंदा बदलत्या वातावरणामुळे सर्वच पिकांवर विपरीत परिणाम झाला असला तरी सर्वात जास्त नुकसान हे फळबागांचे झाले आहे. फळांचे उत्पादन कमी प्रमाणात झाल्यामुळे त्यांना आता चांगला भाव मिळत आहे. बाजाराचे तसे सूत्रच आहे की, उत्पादनात घट झाली तर त्याच्या दरात वाढ होते. यंदा डाळिंब, संत्री, मोसंबी, केळी आदी फळांची आवक आता चांगल्या प्रमाणात होतांना दिसत असून यास चांगले दर मिळत आहे. आपल्याकडे महागडे फळ म्हणून सफरचंदला ओळखले जाते. मात्र यंदा डाळिंब सफरचंदापेक्षा महागडे झाले आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

शेतकऱ्यांच्या खर्चात पडला अधिकचा भर

वातावरणामध्ये सतत बदल होत असल्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होत असून कमी प्रमाणात उत्पादन झाले आहे. शेतात उभी असणारी पिके विविध रोगांचे शिकार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच फवारणीचा खर्च झाला आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पादन हे अतिशय कमी निघले असून शेतकरी चिंतेत आहे. त्यात पिकांच्या दरात सतत चढ उतार होतांना दिसून येत असले तरी डाळिंब पिकाच्या दराने उंच भरारी घेतली आहे.

हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती

डाळिंबला मिळत आहे उच्चांक दर

बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी १४० रुपये प्रति किलो इतका भाव मिळाला. त्या तुलनेत सफरचंदाला कमी दर मिळत आहे. यंदा डाळिंबचे उत्पादन कमी झाले असून दरात वाढ झाली आहे. बाजारामध्ये डाळिंबाची आवक ही चांगली होतांनाचे चित्र दिसत आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून संकटात संपलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

काय आहेत फळांचे दर ?

मोसंबी – १००० ते ६०००
संत्रा – ५०० ते २५००
डाळिंब – १००० ते १५०००
अननस – २०० ते ४००
चिकू – ५०० ते २०००
द्राक्षे – २००० ते ५०००
सफरचंद – ७००० ते १२०००

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *