थंडीत हे पदार्थ खाऊन राहा निरोगी.
थंडीच्या दिवसात खोकला, सर्दी यांसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याचबोबर पचनक्रिया मंदावते. अश्यावेळेस उत्तम आहार घेणे महत्वाचे ठरते. थंडीच्या दिवसात अत्यंत कमी प्रमाणात पाणी पिण्यात येते. त्यामुळे दिवसभर उत्साह राहत नाही. हिवाळ्यात थंडीच्या दिवसात कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास निरोगी राहण्यास मदत होते अश्या पदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत.
भिजलेले बदाम –
१. बदामामध्ये जीवनसत्व इ , प्रथिने, फायबर, मॅगनीज मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
२. बदाम रात्रभर भिजवून ठेवावेत. सकाळी हे भिजलेले बदाम खाल्यास शरीर उबदार राहण्यास मदत होते.
ओटमील –
१. थंडीच्या दिवसात नाष्ट्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे ओटमील.
२. ओटमील मध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज तसेच अनेक पोषक तत्वे उपलब्ध असतात.
३. ओटमील शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास साहाय्य करते.
४. ओटमील चे सेवन केल्यास बऱ्याच वेळपर्यंत भूक लागत नाही.
५. याचे सतत सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
सुका मेवा –
१. जेवणापूर्वी मूठभर सुका मेव्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते.
२. दररोजच्या आहारात बदाम, पिस्ता, किशमिश या सुकामेव्याचा समावेश केला पाहिजे.
३. सुका मेवा हा प्रमाणात खावा. जास्त प्रमाणात खाल्यास त्वचेवर पुरळ येतात.
भिजलेले अक्रोड –
१. दिवसाची सुरुवात भिजलेले अक्रोड खाऊन केल्यास दिवसभर उत्साह कायम राहतो.
२. रात्री अक्रोड भिजवावेत आणि सकाळी त्याचे सेवन करावेत.
३. भिजवलेल्या अक्रोड मध्ये जास्त प्रमाणात पोषक घटक असतात.
मध आणि कोमट पाणी –
१. हिवाळ्यात कोमट पाण्यामध्ये मध घालून त्याचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
२. मधामध्ये जीवनसत्वे, मिनरल्स, एंझाइम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
३. कोमट पाण्यात मध मिसळून पिल्यास विषारी घटक शरीरातून बाहेर पडतात.
पपई –
१. पपई ही अनेक आजारांवर गुणकारी ठरते.
२. पपई आतड्यांची अत्यंत फायदेशीर असते.
३. बाराही महिने पपई बाजारात उपलब्ध असते.
४. पपईचे सेवन केल्यास ह्र्यदयासंबंधीत आजार दूर राहण्यास मदत होते.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास दिवसभर उत्साह वाटतो तसेच शरीर देखील निरोगी राहते.