कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जाणून घ्या आजचे दर
सध्या सगळीकडे उन्हाळी कांद्याची काढणी सुरु आहे. मात्र कांद्याची मागणी कमी तर पुरवठा अधिक होत असल्यामुळे कांद्याचे दर घसरत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांदा किमान ५००, कमाल १,२६०, तर सरासरी ९७५ रुपये प्रतिक्विटलने विक्री होत आहे.
ही वाचा (Read This) कृषी सुवर्ण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी दरात कर्ज मिळेल, ट्रॅक्टरवर देखील मिळणार कर्ज
कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. तसेच निसर्गाचा लहरीपणा, बोगस बियाणे, पाणीटंचाई, कृत्रिम वीजटंचाई, अतिवृष्टी, गारपीट, इंधन दरवाढ, महागडी खते, औषधे, वाढीव मजुरीचे दर यामुळे कांदा उत्पादनाचा प्रतिएकरी खर्चही प्रचंड वाढला आहे.
कांद्याचे आजचे दर
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी केवळ संकटे
कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कांदा लागवड साठवणूक व विक्री व्यवस्थापनामध्ये बळीराजाला अस्मानीसोबतच सुलतानी संकटांना वारंवार सामोरे जावे लागत आहे. त्यातच महागडी खते, वाढते इंधनाचे भाव, नियमित विजेचा प्रश्न याचाही फटकाही बसत आहे.
कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू व्हावी, कागदपत्रांची क्लिष्टता नसावी. अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हे ही वाचा (Read This) युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर, मिळवा भरघोस उत्पन्न
उत्पादन खर्चाच्या तुलनेत कवडीमोल दर
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न काही कमी होताना दिसत नाही. उसानंतर कांदा हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक आहे. नैसर्गिक आपत्तीच्या प्रभावातून शेतकरी वाचला नसला तरी भाव कोसळल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे.
हे ही वाचा (Read This) सरकारी नौकरी 2022: बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज
कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा अधिकच खर्च करावा लागला आहे. याचे कारण म्हणजे बदलते वातावरण होय. त्यात कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. तर आता लाल कांद्या बरोबर उन्हाळी कांदा देखील विक्रीसाठी बाजारामध्ये हाजीर आहे. त्यामुळे कांद्यास कवडीमोल दर मिळत आहे.
हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा