युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर, मिळवा भरघोस उत्पन्न

Shares

गोमूत्र नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतो. त्यामुळे इतर खतांपेक्षा जैविक खतांचा वापर करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे.

रासायनिक खते जमिनीच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक खतांचा वापर करावा. जेणेकरून जमिनीचे आरोग्य सुधारेल तसेच पिकांची चांगली वाढ होऊन अधिक नफा मिळवता येईल.जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर पाहिजे. त्यामुळे जमिनीत हवा आणि ओलाव्याचे योग्य प्रमाण टिकून राहते. उपयुक्त जिवाणू, बुरशी व इतर जिवांची चांगली वाढ होते.

हे ही वाचा (Read This)  शेकडो आजारांना पळवून लावणारे कडुलिंब

युरिया जमिनीत मिसळल्यानंतर त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो त्वरित विरघळतो त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होते. मात्र, पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास होणाऱ्या निचऱ्यासोबत जमिनीत खोलवर जातो किंवा प्रवाहासोबत वाहून जातो. परिणामी भूजल किंवा परिसरातील स्रोत प्रदूषित होतात जमिनीवर विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनशी संपर्क झाल्यानंतर त्यातून नायट्रस ऑक्साइड तयार होऊन हवेत निघून जातो. यामुळे वातावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. अश्यात युरियाच्या ऐवजी जर गोमुत्राचा वापर केल्यास त्यामुळे पिकास तसेच जमिनीस कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

हे ही वाचा (Read This) शेतीसाठी गाळमाती वापरतांना काय घ्यावी काळजी?

युरियाच्या ऐवजी गोमूत्र वापरणे कितपत योग्य ?

गोमूत्रामुळे पिकास कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. याचा वापर कीटकनाशक म्हणून देखील केला जातो. गोमूत्रामध्ये नायट्रोजन सोबत काही प्रमाणात फॉस्फरस देखील उपलब्ध असून नायट्रोजन पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असते.

वाचा (Read This)  काळ्या मक्याची शेती, कोणत्याही हंगामात लागवड करून मिळवा अधिक नफा

युरियामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन उपलब्ध असल्यामुळे शेतकरी युरियाचा वापर करत असतो. युरियाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. शेतकरी पिकांची उत्तम वाढ व्हावी म्हणून युरियाचा वापर करत असतो. युरियामध्ये जवळपास ४६% पर्यंत नायट्रोजन उपलब्ध असते, असे कृषी वैज्ञानिकांनी सांगितले आहे. मात्र आता युरियाच्या ऐवजी गोमूत्र वापरता येते हे वैज्ञानिकांनी देखील तपासून सांगितले आहे.

गोमूत्र नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतो. त्यामुळे इतर खतांपेक्षा जैविक खतांचा वापर करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे.

हे ही वाचा (Read This) मराठवाड्यातील देवस्थान उजळणार!

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *