वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यू संख्येत वाढ, अशी घ्या काळजी

Shares

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यामुळे पशुपालकांना खास काळजी घ्यावी लागणार आहे. उष्णता वाढीचा परिणाम कोंबड्यांवर दिसू लागला आहे. कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेत कमीपणा येतो. तसेच काही वेळा कोंबड्यांच्या अंड्यांचा आकार लहान होतो. अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची होते. त्यामुळे मालकाचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कोंबड्यांची योग्य काळजी घेणे महत्वाची आहे.

हे ही वाचा (Read This)   काळ्या मक्याची शेती, कोणत्याही हंगामात लागवड करून मिळवा अधिक नफा

उष्णतेचा कोंबड्यांवर काय परिणाम होतो?

कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जाणवल्यास त्या शांतपणे उभ्या राहतात. त्यांच्याकडे मंदपणा आणि सुस्तपणा दिसून येतो. त्या जास्त पाणी पितात आणि खाद्य कमी प्रमाणात खातात. काही कोंबड्या पाण्याच्या भांड्याजवळ मान वाकवून उभ्या राहतात, तर काही कोंबड्या भिंतीचा आडोसा घेऊन शांतपणे उभ्या राहतात.

शरीरातील वाढलेल्या उष्णतेला कमी करण्यासाठी आणि थंडपणा आणण्यासाठी कोंबड्या त्यांचे पंख शरीरापासून दूर पसरवितात. उष्णतेचा त्रास आणखी वाढल्यास कोंबड्या तोडांची सतत उघडझाप करतात आणि धापा टाकतात. तर काही लहान कोंबड्यांचा मृत्यू देखील होतो.

हे ही वाचा (Read This)  Summer Special : उन्हाळ्यात प्या उसाचा रस, पहा काय आहेत फायदे

काय घ्यावी काळजी?

  • उन्हाळ्यातील व्यवस्थापन असे हवे कोंबड्यांच्या शेडमध्ये हवा खेळती ठेवावी.
  • उष्माघातापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारच्या आच्छादित भिंत आणि छताच्या शेडमध्ये ठेवावे.
  • छताला पांढर्‍या रंगाने रंगवावे. हे शक्य नसल्यास छतावर वाळलेल्या गवताच्या पेंड्या, भाताचा कोंडा टाकावा आणि त्यास ओले ठेवावे.
  • त्यामुळे शेडमधील तापमान कमी होते.
  • तसेच उन्हाळा सुरू झाल्यावर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये अचानकपणे बदल करून नये.

हे ही वाचा (Read This) Summer Special: उन्हाळ्यात अति थंड पाणी पिण्याचे टाळावेत, माठातील पाणी पिणे अधिक फायद्याचे

  • कोंबड्या जास्त पाणी पितात म्हणून पाण्याची भांडी 50 टक्क्यांनी वाढवावीत.
  • शेडमध्ये पक्ष्यांची अधिक घनता असेल तर ती कमी करावी.
  • कोंबड्यांचे लसीकरण करावयाचे असल्यास सकाळच्या वेळी करावे. लसींची साठवण योग्य तापमानावर करावी कारण उन्हाळ्यात लस नष्ट होण्याचा धोका असतो.

हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *