फळबागांची उन्हाळ्यातील उपाययोजना. एकदा वाचाच
डॉ. अतुल पी. फुसे विषय विशेषज्ञ (उद्यान विद्या) कृषि विज्ञान केंद्र, घातखेड, अमरावती
नमस्कार शेतकरी बांधवांनोनिसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे आणि त्या बरोबरच तापमानाचेप्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अती उच्च तापमानाचा फळझाडांवर । विपरीत परिणाम होतो जसे नवीन लावलेल्या तसेच फळेदेणाऱ्या झाडावर कडक सुर्यप्रकाश, गरम वारे व कोरडी हवा या मुळे परिणाम होवून नुकसान होते. मुख्यत्वेकरून हवा या मुळे कोवळी फुट करपणे, खोड तड़कने, फळगळ होणे, झाडांची वाढ थाबणे आणि शेवटी झाडे मरणे इ. वाईट परिणाम फळझाडावर होतात. याचा एकूण परिणाम फळाचे उत्पादन, फळाची प्रत आणि विक्रीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचेखुप आर्थिक नुकसान होते म्हणून उन्हाळ्यात नवीन तसेच जुण्या बागांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.वर्षातील तीन हंगामापैकी सर्वात जास्त ४० ते ५० टक्के बाष्पीभवन उन्हाळी हंगामात होते. परंतु पावसाळी हंगामात बाष्पीभवनाचेप्रमाण ३०% तर हिवाळी हंगामात हेच प्रमाण २०% असते. उन्हाळी हंगामात उपलब्ध पाण्याचा वापर कार्यक्षमरित्या करणअतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील बाबींचा अवलंब करावा.
सेंद्रिय कार्बन देखील नापीक जमीन सुपीक बनवू शकतो, शेतात वाढवण्याचा नैसर्गिक मार्ग एकदा वाचाच
अ) बागायती फळ पिकांसाठी पाणी व्यवस्थापनउन्हाळ्यात फळ झाडांच्या संरक्षणात प्रामुख्याने पाणी व्यवस्थापन खूपच महत्त्वाचे ठरते म्हणून पाण्याचा काटकसरीने उपलब्धतेनुसार खालील विविध पद्धतीचा वापर करावा फळबागात ठिबक सिंचनाचा वापर, तुषार सिंचन, पट्टा पद्धत, मटका पद्धत इ. आधुनिक पद्धतीने आपणास पाण्याचा योग्य असा वापर करता येतोशिवाय पाणी सकाळी किंवा रात्रीच द्यावे, म्हणजेबाष्पीभवनास आळा बसतो.ठिबक सिंचनहलके पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन खूपच प्रभावी ठरले आहे. या पद्धतीत झाडांना पाहिजे तेवढे पाणी मर्यादीत क्षेत्राला देता येते. पाणी मुळ्याच्या क्षेत्राला मिळत असल्यामुळेमुळाची व झाडांची वाढ चांगली होते. द्राक्ष, संत्रा, मोसंबी, निंबू, नारळ, केळी, चिकू, डाळींब इ. फळबागांसाठी त्या पद्धतीचा विस्तृत प्रमाणावर वापर सुरु झाला आहे. त्या पद्धतीत जवळजवळ पाण्याची ५०% बचत होते. शिवाय फळेकाढणीस लवकर येतात, फळाची प्रतचांगली मिळते.
ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !
आणि रोग, किड व तणाचा प्रादुर्भाव कमी राहतो. उदा. संत्रा मोसंबीच्या झाडासाठी प्रतिदिनी प्रती झाडास फक्त ७० ते९० लि. पाणी पुरेसे आहे. तुपार ही पद्धत, रोपवाटीका आणि कमी उंचीच्या झाडांना फायदेशीर आहे.मटका पद्धतआजच्या उन्हाळ्यातील परिस्थितीत मटका पद्धतीचा वापर यशस्वीपणेझाड जगविण्यासाठी करता येऊ शकतो. या पद्धतीत २ ते ३ लि. क्षमतेचेमटके रोपाच्या बुंध्याजवळ २० ते३० से. मी. खोल जमिनीलगत पेरतात. मटक्याच्या तोंडावर प्लॅस्टीकची जाळी ठेवावी. या पद्धतीत मटक्यातील पाणी बुडात लावलेल्या कापडाच्या तुकड्याव्दारे जमिन पाणी शोषून घेते. या पद्धतीत ४० ते५० टक्के पाण्याची बचत होते. झाडे जीवंत राहून वाढ देखील चांगली होते.
ब) कोरडवाहू फळझाडे जगविण्याचे तंत्रज्ञानमागील ४-५ वर्षात महाराष्ट्रात कोरडवाहू फळझाडात आंबा, बोर, सिताफळ, चिंच, आवळा, कवठ, जांमूळ इ. फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लावलेली सर्व झाडेउन्हाळ्यात जगविणे जरुरीचे आहे. त्यासाठी जलशक्तीचा वापर, आच्छादनाचा वापर, बाष्पीरोधकाचा वापर, वारा प्रतिरोधकाचा वापर इ. नवीन विकसित तंत्राचा वापर आवश्यक ठरते.
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी गाळमाती वापरतांना काय घ्यावी काळजी?
१) जलशक्तीचा वापर जलशक्ती हे अतिजलशोषक असे संयुक्त रसायन आहे. जमिनीत टाकल्यास हे पाणी धरुन ठेवते आणि अवर्षण काळात उपलब्ध करुन देते. जलशक्ती व जमिनीत आठ महिनेकार्यक्षम राहते आणि १ कि. जलशक्ती जवळपास १०० ते५०० लि. पाणी धरुन ठेवते. जमिनीत प्रत्येक खड्ड्यात १०० ते २०० ग्रॅम या प्रमाणात प्रतिझाड जलशक्ती पावडर वापरल्यास पाण्याची बचत होवून पाण्याच्या पाळ्या देखील, कमी होतात.
२ ) आच्छादनाचा वापर पिकाची वाढ होत असताना पिकांच्या पानावाटेतसेच जमिनीच्या पृष्ठभागावरुन पाण्याची वाफ होवून ते वातावरणात निघून जाते. तथापी जमिनीच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवन होवून वाया जाणारे पाणी आच्छादनाचा वापर करून थोपविता येते. या पद्धतीत झाडाभोवतालच्या आळ्यामध्ये १० सेमी जाडीचे आच्छादन करतात. आच्छादनासाठी वाळलेलंगवत, मुसा, पालापाचोळा, ज्वारी, गहू, उसाचे पाचट याचा वापर करावा. आच्छादन करण्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये ५० ग्रॅम लिन्डेन पावडर टाकावी. आच्छादनासाठी काळ्या मेनकापडाचा देखील वापर करतात. आळ्याच्या आकाराचे ३० गेज जाळीचेमेन कापडाचे तुकडे करून आळ्या मध्ये पसरावे. आळ्यामध्ये मध्यभागी खोडाच्या आकाराचे छिद्र करावे. असेच मेनकापड उडून जावू नये म्हणून मातीने झाकून टाकावे. यापद्धतीने बाष्पीभवन थांबवून जमिनीतील पाण्याची उपलब्धता व झाडांना जगण्यासाठी आवश्यक ते पाणी मिळते.
हे ही वाचा (Read This) पेस्टीसाईडचा सुरक्षित वापर करणे आहे अत्यंत गरजेचे
३) बाप्पीरोधकाचा वापर उन्हाळ्यामध्ये पानां व्दारे मोठ्या प्रमाणावर बाष्पी भवनामार्फत पाणी बाहेर फेकलेजाते. तसेच सूर्यप्रकाश व तीव्र तापमान असल्यामुळे पानाचे तापमान देखील वाढते या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाष्परोधक रसायनाचा वापर सुरु झाला आहे. केओलिनचे ८% भुकटी द्रावण पानांवर फवारावे. पानांवर पडणाऱ्या पांढऱ्या के ओलिन मुळे सूर्यकिरण परावर्तीत होतात, त्यामुळे पानांवर पडणारी उष्णता कमी होवून बाष्पीभवन कमी प्रमाणात होते.
४) द्वारा प्रतिरोधकाचा वापरबागेभोवती तसेच झाडाभोवती स्वतंत्र असेवारा प्रतिरोधक (वीडब्रेक) निर्माण करणेउन्हाळ्यात अत्यंत जरुरीचे असते. वारा प्रतिरोधक म्हणून शेवरी, गजराज, ज्वारी किंवा मक्याच्या ओळी, जांभूळ, ग्लिरेसिडीया पिके फळझाडाच्या प्रकारानुसार लावावे. वारा प्रतिरोधक वापरल्या मुळे गरम हवा बागेमध्ये येण्याचे थोपविल्या जाते.तसेच बागेची आर्द्रता वाढविण्यास मदत होते. बागेतील तापमान २ ते३ अंश से. ग्रेड कमी होऊ शकते. याशिवाय पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढवून पाण्याच्या पाळ्या देखली कमी करता येतात. वारा प्रतिरोधक न वापरल्यास फळझाडांवर विपरीत परिणाम होतो. तसेच फांद्या मोडणे, फळांची गळ होते आणि फळांची प्रत सुद्धा घसरू शकते.
हे ही वाचा (Read This जनावरांचे चारा व्यवस्थापन कसे करावे? एकदा वाचाच
५) उन्हाळ्यात झाडाच्या खोडाचेसंरक्षण करणे बागेतील कोरडवाहू तसेच ओलीता खालील फळझाडाच्या खोडाचेकडक उन्हाळ्यापासून व गरम वान्यापासून संरक्षण करणेमहत्त्वाचेठरते. कडक उन्हामुळेउन्हाळ्यात झाडाची साल तडकल्या जाते. करपतेव हळूहळू झाडाची वाढ थांबत झाडाची मर देखील होते. हेदुष्परिणाम टाळण्यासाठी खोडांना १ ते२ मिटर उंचीपर्यंत चुना मलम किंवा मिस्ट ब्रशच्या सहाय्यानेफेब्रुवारी मध्येच लावावे. बोइपिस्ट १ किलो, चुना १ किलो, मोरचुद १० लि. पाणी या प्रमाणात करून खोडास लावावे. खोडांना चुना मलम किंवा बोडोपेस्ट लावल्यामुळे सूर्यकिरण परावर्तीत होतात, त्यामुळे खोडाचे तापमान कमी राहतेव साल तडकत नाही. तसेच खोडाभोवती वाळलेल्या गवताच्या पेंढ्या सुतळीने बांधाव्या.
६) उन्हाळ्यात सावली करणे उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळेव गरम हवेमुळे लहान रोपांना सावलीची अत्यंत आवश्यकता असते. यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करता येईल या वस्तूचा वापर झाडांचा आकार, क्षेत्रफळ आणि शेतात असलेल्या वस्तू, यावरून ठरवावेलागते. उदा. तयार मांडवांचा आकार ३ फुट उंच २ फूट रुंद आकाराची असावी. मांडव झाडाच्या सभोवताली आणि वरुन मांडव खोपी करावी या करीता शेतातील उसाची पाचट, तनस, गवत, याचा वापर करावा.या पद्धतीशिवाय झाडाभोवती तुराट्याचेकुंपन करावे. तुराट्याचे बुळ जमिनीमध्ये व्यवस्थीत गाळावे. या पद्धतीमुळे बाष्पीभवन कमी होवून झाडोभोवतालचेतापमान देखील कमी राहतेव परिणामतः झाडेजगण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात सावलीसाठी आणि तापमान कमी करण्यासाठी एरंडाची सावली अत्यंत फायद्याची दिसून आली आहे. त्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येएरंडाच्या चार तेपाच बिया डोबाव्यात. त्यामुळे उन्हाळ्यात कलमवार सावली मिळते. आर्द्रता देखील वाढतेव तापमान देखील कमी होते.
खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर हे सोपे काम मे महिन्यात नक्की करा
पाण्याची उपलब्धता असल्यास प्रत्येक झाडाभोवती स्वतंत्ररित्या बांगडी पद्धतीने बोरुच्या तीन तेचार ओळी जानेवारी फेब्रुवारी मध्ये बी पेरून लावाव्या, त्यामुळे कलमांना संरक्षण मिळते.ज्यांच्या कडे बऱ्यापैकी पाणी उपलब्ध असल्यास आंतरपीक म्हणून भुईमुंग, भाजीपाला इ. पिके उन्हाळ्यात घ्यावीत त्या मुळे कलमांना आपोआप पाणी मिळते, आर्द्रता जास्त राहतेव झाडे जगण्याचे प्रमाण वाढते. अशा प्रकारे शेतकरी बंधुंनी उन्हाळ्यात फळझाडांचे संरक्षण केल्यास यावर्षी राहणाऱ्या तीव्र उन्हाळ्यात आपल्या फळझाडांचे संरक्षण करून आपल्या फळबागा जीवीत ठेवता येईल.
धन्यवाद शेतकरी बांधवांनो
डॉ. अतुल पी. फुसे
माहीती यांच्या मार्गदर्शनानुसारविषय विशेषज्ञ (उद्यान विद्या) कृषि विज्ञान केंद्र,
घातखेड, अमरावती
माहिती संकलन
मिलिंद जि गोदे
Save the soil all together
हेही वाचा :- नागरिकांनो काळजी घ्या ..! राज्यातील ‘या’ शहरात पुन्हा उष्णतेची लाट