इतर बातम्यारोग आणि नियोजन

पिकांच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी गंधक महत्वाचे

Shares

पिकाची चांगली वाढ होऊन उत्तम प्रतीचे उत्पादन व्हावे यासाठी पीक व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तर अन्नद्रव्य यासाठी महत्वाचे कार्य करते. यामध्ये मुख्यतः स्फुरद, नत्र, पालाश यांचा समावेश होतो.
अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता अधिक प्रमाणात जाणवू लागली आहे. तर पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि जमिनीचा सामू नियंत्रित करण्यासाठी गंधक महत्वाचे ठरते.

गंधकाचे महत्व

  • गंधक हे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते.
  • पीक उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये वाढ.
  • गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसेच सिस्टीन, सिस्टाईन व मिथीनोओतीत या आवश्‍यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे.
  • जमिनीचे आरोग्य आणि उत्पादकता टिकते.
  • गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते, विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते.
  • नत्राची कार्यक्षमता व उपलब्धता वाढते.
  • भुरीच्या नियंत्रणासाठी गंधकाचा ८० टक्के वेटेबल पावडर म्हणून वापर होतो, कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो.
  • गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्‍लेषणामध्ये वाढ होते.
  • गंधकाला भूसुधारक असे म्हणतात. कारण गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो, त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये याचा वापर करावा.
  • प्रथिनांचे प्रमाण वाढते. फळांमधील विद्राव्य पदार्थांचे प्रमाण वाढते.
  • बुरशी व लाल कोळी नियंत्रणाचा व दुसरा उपयोग म्हणजे भूसुधार. अर्थात या साठी एलेमेंटल स्वरूपातील गंधक वापरावे लागते.
  • गळीत धान्यामध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी गंधक उपयुक्त ठरते.

हे ही वाचा (Read This) शेतीतील एक वेगळा प्रयोग, या पिकाची लागवड करून घ्या चांगले उत्पन्न

पिकांमध्ये गंधक कमी असल्याचे लक्षणे

  • पिकांची वाढ खुंटते, पीक कमजोर दिसते.
  • नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागतात.
  • द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरणाच्या प्रमाण कमी होते.
  • नवीन येणारी पाने पिवळी पडू लागतात, देठ किरकोळ व आखूड राहतात. कोवळ्या पानांवर जास्त परिणाम दिसतो.
  • तृणधान्य वर्गीय पीक परिपक्व होण्यास उशीर लागतो. फळे पूर्णपणे पिकत नाहीत.
  • पिकातील गंधकाची कमतरता सहज दिसून येते. पिकाची वाढ खुंटते, ते कमजोर दिसतात.
  • फळे पिवळसर हिरवी दिसतात. वाढ कमी होते. रंग बदलतो, आतील गर कमी होतो.

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

गंधकासाठी स्रोत

  • सेंद्रिय खते
  • जमीन
  • पिकांचे अवशेष
  • गंधकवर्गीय कीटकनाशके
  • पाऊस तसेच ओलीत

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

गंधकयुक्त खते कशी द्यावीत?

  • तेलबिया पिकांना प्रति हेक्टर प्रमाणे २० किलो गंधक जमिनीद्वारे द्यावे.
  • शिफारसीनुसार पिकानुरूप जमिनीद्वारे गंधकयुक्त खते द्यावीत.
  • नत्र , स्फुरद, पालाश, गंधक यांचे गुणोत्तर ४ : २ : २ : १ असे असावेत.
  • गंधकयुक्त खतांच्या मात्रा पेरणीपूर्वी जमिनीमध्ये पेरावेत.
  • साधारणतः जिप्सम आणि सिंगल सुपर फॉस्फेट ही सर्वसाधारणपणे गंधकयुक्त खते म्हणून वापरली जातात.
  • गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत विविध पिकांसाठी २० ते ४० किलो गंधकाची मात्रा उपयुक्त ठरते.
  • समतोल खत व्यवस्थापनासाठी माती परीक्षण करून जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता तपासावी.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात करा या झाडाची लागवड, नक्कीच बनवेल करोडपती

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *