सोयाबीनचे दर ६ हजार ५०० वर स्थिरावले, आवक जोरदार
गेल्या अनेक महिन्यांपासून सगळीकडे सोयाबीनची चर्चा सुरु आहे. याच कारण म्हणजे सोयाबीनच्या दरात सतत होणारी चढ उतार. मात्र आता पहिल्यांदाच मागील ८ दिवसापासून सोयाबीनचे हे सलग ६ हजार ५०० वर आहे मात्र आवक ही वाढलेली दिसून येत आहे. सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त सोयाबीनची आवक होत असून आता रब्बी हंगामात सोयाबीनची आवक अधिक वाढणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा ( Read This) राज्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव, शेकडो कोंबड्यां मृत्युमुखी
शेतकऱ्यांचा आता सोयाबीन विक्रीवर जास्त भर
खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात वाढ होऊन दर स्थिर झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ६ हजार ५०० रुपये क्विटंलचा दर मिळाला आहे. वाढत्या दरामुळे आता कुठे आवक सुधारत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी १९ हजार पोत्यांची आवक झाली असून शेतकऱ्यांनी साठवूक केलेल्या सोयाबीनच्या विक्रीला सुरवात केली आहे. शिवाय भविष्यात उन्हाळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाल्यावर दर कमी होतील या धास्तीने आता शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देत आहेत.
रब्बी हंगामातील पीक काढणीस सुरुवात
शेतकरी आता खरीप हंगामातील अनेक संकटांचा सामना करून आता शेवटच्या टप्प्यात पोचले आहे. तर आता रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीस सुरुवात झाली असून हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य पीक मानले जाते. सध्या हरभऱ्याच्या आवक मध्ये देखील वाढ होतांना दिसून येत आहे. मध्येच होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हरभऱ्याची साठवणूक न करता काढणीनंतर थेट बाजारात विक्रीस नेत आहेत. सध्या हरभऱ्यास ४ हजार ७०० दर मिळत असून काढणीनुसार आवक वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा ( Read This) माती चे शोषण नाही पोषण करा….