सोयाबीनच्या दरात हलकी वाढ, हीच ती निर्णय घ्यायची वेळ?
सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होतांना आपण पहिले आहे. दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनला ४ हजार ५०० असा दर होता. आता हा दर ६ हजार ५०० वर आला आहे. सोयाबीनच्या दरात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक टप्याटप्याने त्याची आवक सुरु केली होती. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सोयाबीनच्या दरावर चांगला परिणाम झाला आहे.
हे ही वाचा (Read This ) हळदीची आवक सुरु होताच मिळाला विक्रमी दर
सध्याच्या स्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा
जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे दर घटले होते. परंतु आता सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून हे दर सध्या स्थिर आहेत. मात्र सोयाबीनचे दर हे १० हजारापर्यंत जावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सोयाबीनची सध्याची स्थिती मागच्या वर्षीप्रमाणे नसून यंदा पावसामुळे सोयाबीन डागाळलेले असून त्यास जास्त मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सध्याची स्थिती बघून सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा असे व्यापारी अग्रवाल यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This ) या शेतीबरोबर उद्योगाची उत्तम संधी, विक्रमी दराबरोबर अनुदानाचा लाभ
सोयाबीनचे दर स्थिर
मागील महिन्यात सोयाबीनचे दर हे ४ हजार ५०० असे होते. आता गेल्या ६ दिवसापासून सोयाबीनच्या दरात वाढ होतांना दिसून येत असून हे दर ६ हजार ५०० वर स्थिर झाले आहे. भविष्यात हे दर एवढेच राहतील याची खात्री देता येत नसून आताच शेतकऱ्यांनी त्यांचा विक्रीबाबतचा निर्णय घ्यावा असे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज