या शेतीबरोबर उद्योगाची उत्तम संधी, विक्रमी दराबरोबर अनुदानाचा लाभ

Shares

अनेकदा शेतकरी कोणते पीक घ्यावे या विचारात असतात. तर आपण आज एका अश्या पिकाची माहिती घेणार आहोत ज्यामधून तुम्हाला अधिकच नफा होईल कारण या पिकाच्या किंमतीत कायम वाढ होत असते. होय. रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपुढे उत्तम पर्याय उभा राहत आहे. रेशीम शेतीबरोबरच रेशीम धागा तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये देखील वाढ होत आहे. यंदा १० हजार हेक्टर मध्ये तुतीची लागवड करण्यात आली असून यामधून २ हजार २०५ टन कोश उत्पादन मिळेल असा दावा आहे,

हे ही वाचा (Read This ) IAS बनणारा झाला शेतकरी, संत्रीचे ३ एकरात घेतले ९ लाखाचे उत्पन्न

रेशीमला विक्रमी दराबरोबर अनुदानाचा लाभ …

गेल्या आठवड्यात रेशीम कोशाला १ हजार ४२ रुपये दर मिळाला असून तुती लागवड क्षेत्र वाढले आहे. म्हणजे साधारणतः रेशीम कोशाला १ लाख रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सरकारने यासाठी योजनादेखील राबवली आहे. शेतकरी रेशीम शेती करत असेल तर ते सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजने अंतर्गत १ एकरसाठी तुती लागवड जोपासना तसेच साहित्य खरेदी यामध्ये रोपे, खते, औषधी यासाठी एकूण २ लाख १७६ रुपये इतके अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाते. तसेच किटक संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात ९२ हजार २८९ रुपये अनुदान देण्यात येते. परंतु जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

धागा तयार करणाऱ्या उद्योगामध्ये पडली भर
राज्यामध्ये कोशापासून धागा तयार करणारे ३ उद्योग आहेत यांमध्ये अधिक २ उद्योगांची भर पडणार असल्याची माहिती रेशीम महासंचालनालयाने दिली आहे. राज्यात यंदा तुती लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढणार हे निश्चित असून शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या अनुशंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. दोन उद्योग उभारणीला मंजूरी मिळाली असून लवकरच याचे काम सुरु होणार आहे अशी महासंचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी माहिती दिली.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *