योजना शेतकऱ्यांसाठी

या राज्याने शेतकऱ्यांसाठी आणली ७५% सब्सिडीवर सोलर पंप योजना

Shares

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान योजनेअंतर्गत हरियाणाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग ७५ टक्के अनुदानावर ३ HP, ५ HP, ७.५ HP, 10 HP सौर पंप स्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्याची क्रिया सुरु झाली आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाने अनुदानावर दिलेले सौरपंप दुसऱ्याला विकून अन्य ठिकाणी बसविण्याच्या तक्रारी येऊ लागल्याने विभागाने असा निर्णय घेतला आहे; सोलर सिस्टीम सोलर पंप कनेक्शनवर ७५ टक्के सबसिडी देण्यात आली आहे. विजेचा वापर कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. सोलर पंप नेमून दिलेल्या ठिकाणीच बसवला जाईल. अधिकारी केव्हाही सौरपंप यंत्रणेची तपासणी करू शकतात.

तुमचे शिक्षण कमी आहे , रोजगाराच्या शोधात आहात तर या योजना खास तुमच्यासाठी आहे. हे ही वाचा.

सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनेंतर्गत सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच सौर जोडणी दिली जाईल; अशा सिंचनासाठी शेतकऱ्याकडे सर्वप्रथम डिग्गी असणे आवश्यक आहे. जेणेकरून डिग्गीमध्ये साठलेले पाणी सिंचनासाठी पुरवता येईल. सोलर पंप निर्धारित केलेल्या जागेवरच स्थापन केले जाईल. जेणेकरून अधिकारी सोलर पंप वर लक्ष ठेवू शकतील. राज्य स्तरावर ८६०० कनेक्शन दिले जाणार असून जो हाजीर तो वजीर असेल. ज्या शेतकऱ्याला सौरपंप कनेक्शन बसवायचे आहे ते 27 डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून यासाठी काही महत्वाचे कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *