शेण खताचे फायदे आणि घ्यावयाची काळजी
शेणखत म्हणजे नेमकं काय ? गाई म्हशींचे शेण , मूत्र आणि गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खतास शेणखत म्हणतात. शेणाचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस मध्ये केला जातो. शिल्लक राहिलेल्या पातळ शेणाचा उपयोग पोषक अन्नद्रव्य म्हणून पिकांच्या वाढीसाठी केला जातो. शेणखतामधून पिकास पालाश , नत्र व स्फुरद मिळते. शेणखताचा वापर पोषक अन्नद्रव्य म्हणून केला जातो. जमिनीसाठी शेणखताचा वापर मोलाचा आहे. तर जाणून घेऊयात शेण खताचे फायदे आणि शेण खत वापरतांना घ्यावयाची काळजी बाबत माहिती.
फायदे –
१. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
२. जमिनीच्या सामू मध्ये अपेक्षित बदल होतो.
३. जमिनीतील गांडूळांचा वावर वाढतो.
४. पांढऱ्या मुळींची वाढ होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी राहते.
५. शेणखताचा वापर केल्यास उत्पादन चांगले येऊन उत्पादनात त्यात वाढ होते.
शेणखत वापरतांना घ्यावयाची काळजी –
१. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पाऊस पडतो तेव्हा पावसाबरोबर हुमणीच्या मादी भुंगेरे कुजणाऱ्या शेणात अंडी घालतात. पिकास अश्या शेणखताचा वापर केल्यास शेतात हुमणीच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी शेणखत तपासून पूर्व काळजी घेतली पाहिजे.
२. कुजलेल्या शेणात पिकास हानिकारक असे मर रोग , करपा , सड , बुरशी या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी नसाव्यात याची दक्षता घ्यावी.
३. शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते.अश्या ताणाच्या मुळास लटकलेली माती रोगकारक जिवाणूंसह खड्यात जाणून इतर सेंद्रिय पदार्थांबरोबर वाढते. अश्या वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे गरजेचे ठरते.
४. अनेक शेतकरी शेतातील उकिरड्यावर व खड्यात वर्षभर साठवलेले शेण खत म्हणून वापरतात. अश्या शेणामध्ये शेणकिडे होण्याची संभाव्यता जास्त असते. हे शेणकिडे शेतातील पिकास नुकसान पोचवितात.
५. शेणखत चांगले कुजविण्यासाठी कंपोस्टिंगकल्चर वापरावेत.
६. शेणात प्लास्टिक , सुया , काच , टाकाऊ पदार्थ आहेत की नाही तपासून घेणे.
शेण खत अत्यंत उपयुक्त जरी असले तरी तर वापण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे.