इतर बातम्या

आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय

Shares

शेतीसंबंधित सरकार वेगवेगळे आणि वेळोवेळी निर्णय घेत असते. आता सातबारा उतारा बंद करण्याचा नवीन निर्णय सरकरने घेतला आहे. होय, शेतजमिनीची (Farm Land) सर्व कुंडली सांगणारा सातबारा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय वाढत्या शहरांसाठी घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर सगळीकडे शहरीकरण होतांना दिसत असल्यामुळे शेतजमिनी (Farm Land) आता शिल्लक राहिलेल्या नाही. अश्या ठिकाणचा सातबारा बंद (Satbara Extract) करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.अनेक जण फक्त विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा काढल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भूमी अभिलेख विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सातबारा उतारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठीच्या १४ अंकाचा युनिक लँड आयडीची चाकण पासून सुरुवात

सातबाराच्या ऐवजी प्रॉपर्टी कार्ड
अगदी तेजीत शहरीकरण होत असल्यामुळे आता अनेक शहरांमध्ये शेतजमिनच शिल्लक राहिलेली नाही. राज्यातील अनेक शहरांमध्ये सिटी सर्वे झाला असून त्यांना प्रॉपर्टी कार्ड (Property Card) देण्याचे काम सुरु आहे. तरीही अनेक शहरांमध्ये सातबारा उतारा (seventeen Excerpts) देण्यात येत असून कृषी (Agriculture) संबंधित योजनेचा लाभ संबंधित नागरिक घेतांना दिसून येत आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो हा व्यवसाय करून महिन्याला कमवा लाखों रुपये

सातबारा बंद करण्यामागील नेमकं कारण काय?
सातबाराचे प्रॉपर्टी कार्ड मध्ये रूपांतर होऊन देखील अनेक जणांनी सातबारा कायम ठेवला आहे. जेणेकरून त्यांना योजनांचा लाभ घेता येईल. अश्या वाढत्या फसवणुकीमुळे सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. प्रॉपर्टी कार्ड असूनही सातबारा बाळगणाऱ्या अनेकांवर कारवाई होत असून न्यायालयीन खटल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जमिनीचा सातबारा कमी करण्याचे प्रक्रिया आता भूमी अभिलेख विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *