शेतकऱ्यांनो हा व्यवसाय करून महिन्याला कमवा लाखों रुपये

Shares

कमी गुंतवणूक करून अधिक नफा कसा मिळवता येईल या शोधात अनेकजण असतात. अश्याच एका व्यवसायाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. हा व्यवसाय तुम्ही अगदी एका छोट्या खोलीत देखील करू शकता तर या व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज देखील नाही. अगदी कमी प्रमाणात गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही जर हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला तर तुम्ही अगदी महिन्याभरातच लाखो रुपयांची कमाई करू शकता. हा व्यवसाय शेतीशी (Agriculture) निगडित असून हा व्यवसाय म्हणजे मशरूम शेती होय. मशरूमची शेती ( Mushroom Farming) करण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची गरज नाही मात्र जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात मशरूम शेती करायची असेल तर तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेतल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल.

हे ही वाचा (Read This ) राज्यात सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा होणार फायदा

हा व्यवसाय कसा सुरु करावा ?
तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. तुम्ही अगदी काही हजार रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरु करू शकता. मशरूम शेती ही नेहमीच फायदेशीर ठरत असून गुंतवणूक केलेल्या खर्च्याच्या ७ ते १० पट जास्त नफा तुम्ही मिळवू शकता. तसेच बाजारपेठेत मशरूमची मागणी वाढलेली असून त्यास मुबलक दर देखील मिळत आहे.

कशी करावी मशरूम शेती ?
मशरूमची शेती ही ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान केली जात असून मशरूम तयार करण्यासाठी तांदूळ किंवा गव्हाच्या पेंढ्यामध्ये काही रसायने मिसळून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. हे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी साधारणतः १ महिना लागतो. एका कठीण जागेवर ६ ते ८ इंचाचा थर देऊन मशरूमच्या बिया पेरल्या जातात आणि त्या बिया कंपोस्ट खताने झाकल्या जातात. जवळजवळ ४० ते ५० दिवसात मशरूम कापून विक्रीसाठी तयार होते. मशरूमची लागवड ही उघड्यावर केली जात नसल्यामुळे यासाठी शेडची गरज असते. अगदी तुम्ही एका खोलीत देखील याची लागवड करू शकता. तसे पहिले तर इतर व्यवसायाच्या तुलनेत या व्यवसायामध्ये स्पर्धा नाहीच्या बरोबरीने आहे.

काय घ्यावी काळजी ?
मशरूम चा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. मशरूमची शेती करण्यासाठी योग्य तापमान असणे गरजेचे आहे. मशरूम १५ ते २२ अंश सेंटीग्रेड च्या दरम्यान घेतले जाते. जास्त तापमान असेल तर पीक निकामी होते. मशरूमची लागवड करतांना आद्रता ८० ते ९० टक्के असावी. मशरूमची वाढ चांगली व्हावी यासाठी कंपोस्ट खत चांगले असणे गरजेचे आहे. फार जुन्या बियाण्यांचा वापर केल्यास मशरूमचा दर्जा घसरण्याची शक्यता असते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *