सर्वाधिक अंडे मिळवून देते कोंबडीची ही जात !
शेतकरी अधिक उत्पन्नासाठी शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन , कुकुटपालन करत असतो. अत्यंत कमी जागेत करता येणार व्यवसाय म्हणजे कुकुटपालन. साधारणतः कुकूटपालनात वनराज, सुवर्णधारा, गिरीराज, कॅरी या जाती पाहण्यास मिळतात. परंतु कोंबड्यांची एक जात अशी आहे जी अधिक उत्पन्न मिळवून देण्यास मदत करते. आपण आज अश्याच ग्रामप्रिया नावाच्या कोंबडीच्या जातीची माहिती जाणून घेणार आहोत.
ग्रामप्रिया कोंबडी –
१. ग्रामप्रिया जातीच्या कोंबड्या मध्यम वजनाच्या असतात.
२. या जातीच्या कोंबड्यांचे पाय मजबूत , लांब सडक असतात.
३. अंडे उत्पादनासाठी कुकुटपालन करत असाल तर ही जात अत्यंत फायदेशीर ठरते.
४. या जातीच्या कोंबड्यांचा अंड्याचा रंग गुलाबी , तपकिरी असतो.
५. या कोंबड्यांची लहान असतांना जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते.
६. थंड वातावरणात या पिल्लांसाठी उष्णता निर्माण करावी लागते.
ग्रामप्रिया कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन-
१. ग्रामप्रिया कोंबड्यांना सुरुवातीच्या २ दिवस मका भरडून द्यावा.
२. यांना बाजरी, ज्वारी, सूर्यफूल, तांदळाचा चुरा शेंगदाणे पेंड आदी खाद्य देऊ शकता.
३. या जातीच्या कोंबड्यांना आहारातुन खनिज, जीवनसत्वे, फॉस्फरस भेटतील याची काळजी घ्यावी.
४. यांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी.
५. साधारणतः एक महिन्यानंतर त्यांना शेवगाचे पत्ते, लसूणघास , पालक थोड्या प्रमाणात दिल्यास त्यांच्या पंखांना चकाकी येते.
ग्रामप्रिया कोंबडीचे वैशिष्ट्ये-
१. यांचे ६ आठ्वडूयातच ४०० ते ५०० ग्रॅम वजन होते.
२. कालांतराने ६ ते ७ महिन्यात त्यांचे वजन १६०० ते १८०० ग्रॅम होते.
३. यांची पहिली अंडी देण्याचा काळ १६० ते १६५ दिवसांचा असतो.
४. दीड वर्षाला २०० ते २५० अंडी उत्पादकता होते.
५. यांचे सरासरी वजन ५२ ते ५८ ग्रॅम असते.
रोग व्यवस्थापन –
१. कोंबडीच्या या जातींमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात असते.
२. या कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे.
३. यांना ३ दिवसांनंतर रानीखेत नावाची लस लासोटा प्रकार १ थेंब डोळ्यात द्यावी लागते.
४. या नंतर देवी नावाची फाऊल पॉक्स ०.२० एम एल लस द्यावी.
५. यांना लसीकरण करतांना सकाळी नऊच्या अगोदर किंवा संध्याकाळी सहाच्या नंतर करावी.
ग्रामप्रिया कोंबडीची योग्य काळजी घेतल्यास त्यापासून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. कोंबडीच्या जातीची निवड करणे कधीही फायदेशीर ठरते.