डिसेंबर महिन्यात या पिकांची लागवड करून कमवा लाखों रुपये !

Shares

शेतकरी हंगामानुसार पालेभाज्यांची लागवड करत असतो. अगदी कमी खर्चात भाजीपाला लागवड करता येते. पालेभाज्यांची लागवड करून अधिक नफा मिळवता येतो. परंतु पालेभाज्यांची लागवड ही वेळेत केली गेली पाहिजे अन्यथा उत्पादनावर याचा परिणाम होऊन पिकाची गुणवत्ता कमी होते. डिसेंबरच्या महिन्यात शेतकरी मोठ्या संख्येने पालेभाज्यांचे पीक घेण्याकडे वळत असतो. डिसेंबर महिन्यात नेमक्या कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
डिसेंबर महिन्यात घेतले जाणारे भाजीपाला पीक –
मुळा लागवड –
१. डिसेंबरच्या महिन्यात मुळा लागवड करून त्यातून उत्तम उत्पन्न मिळवता येते.
२. मुळा लागवडीसाठी थंड हवामान मानवते.
३. मुळा पिकाची लागवड सेंद्रिय चिकणमाती असलेल्या जमिनीत केल्यास पीक चांगले येते.
मुळाच्या सुधारित जाती-
१. पंजाब सफेद
२. पुसा चेतकी
३. पंजाब एजेटी
४. व्हाईट टिप्स
५. पुसा रेश्मी
६. अर्का निशांत
७. पुसा देशी
८. जपानी सफेद
९. १-१ कल्याणपूर सफेद

पालक लागवड
१. हिरव्या पालेभाज्यांपैकी प्रमुख भाजी म्हणून ओळखली जाणारी भाजी म्हणजे पालक.
२. पालक भाजी हिवाळ्यात सर्वाधिक खाल्ली जाते.
३. पालक पिकाच्या लागवडीसाठी थंड हवामानाची गरज असते.
४. पालक पिकाची लागवड करतांना हंगामाची विशेष दक्षता घ्यावी लागते.
पालकाच्या सुधारित जाती-
१. पंजाब ग्रीन
२. पूजा ज्योती
३. पुसा पालक
४. पंजाब सिलेक्शन
५. पुसा भारती
६. पुसा हरित

टोमॅटो लागवड –
१. टोमॅटो लागवडीस डिसेंबर महिना उत्तम ठरतो.
२. टोमॅटो लागवड करतांना त्याच्या सुधारित वाणांची लागवड करून अधिक उत्पादन मिळवता येते.

टोमॅटोच्या सुधारित जाती-
१. अमर
२. करीन
३. अजित
४. जयश्री
५. रिटा
६. विशाल
७. विपुलन
८. अंकुश
९. सर्वोदय
१०. निवड – ४
११. समय किंग
१२. ५-१८ स्मिथ

पालक, मुळा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात तर टोमॅटो पिकास बाराही महिने मागणी असते. डिसेंबर महिन्यात या पिकांची लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळवता येते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *