गव्हाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ, फायदा कोणाचा ?
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन घेतले जाते. तर पंजाब, मध्य प्रदेश मध्ये अधिक प्रमाणात गहू लागवड केली जाते. तरीही गव्हाच्या दरामध्ये वाढ होण्याचे नेमके कारण काय ?
कल्याण कृषी बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली असून दिवसाला ५५० टन गव्हाची आवक होत आहे. मात्र रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम गव्हाच्या दरावर झाला आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात उत्पादन चांगले झाले असले तरी दरामध्ये वाढ झाली आहे.
हे ही वाचा (Read This ) एकदाच करा या पिकाची लागवड मिळेल १२ वर्ष उत्पन्न ते हे लाखात, सरकार करणार मदत
गव्हाच्या पोळीला जास्त प्राधान्य
भारतामध्ये तीन प्रकारच्या गव्हाची लागवड केली जाते. त्यातील लोकवन गहू जास्त महाग झाल्यामुळे एमी क्रॉस आणि एमपी सिहोर या गव्हाची मागणी वाढली आहे.
भारतात गव्हाची पोळी ही अनेक भागांमध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते. त्यात जर मधुमेह झाला असेल तर मैदा आणि भात वर्ज्य असल्यामुळे गव्हाच्या पोळीस जास्त प्राधान्य दिले जाते.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?
गव्हाच्या किमतीमध्ये वाढ
युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात उत्पादन चांगले झाले असले तरी दरामध्ये वाढ झाली असून प्रति किलो मागे ३ रुपयांची वाढ झाली आहे.
गव्हाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कळ बसली असली तरी व्यापारी आणि शेतकऱ्यांचा फायदा होतांना दिसत आहे.
हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये