इतर बातम्याबाजार भाव

हळदीची आवक सुरु होताच मिळाला विक्रमी दर

Shares

निसर्गाच्या लहरींमुळे यंदा जवळजवळ सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी, अतिवृष्टी यामळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. असेच काही हळदीच्या पिकाचे देखील झाले आहे. आता हळदीचा हंगाम सुरु झाला असून मुख्य बाजारपेठेत आता हळदीची आवक सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच २ प्रकारच्या हळदीची आवक झाली असून राजापुरी हळदीला जास्त दर मिळत आहे.
यावेळेस उत्पादनात घट झाल्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच हळदीचे दर चढे असलेले दिसून येत आहे. सांगली बाजारपेठेत राजापुरी आणि परपेठेची ८ ते ९ हजार पोत्यांची आवक सुरु झाली आहे. उत्पादनात किती घट आहे यावर हळदीचे पुढील दर अवलंबून आहे.

हे ही वाचा (Read This ) या शेतीबरोबर उद्योगाची उत्तम संधी, विक्रमी दराबरोबर अनुदानाचा लाभ

पुढे हळदीच्या दरात अशीच तेजी राहणार ?

उत्पादन घट झाल्यानंतर एखाद्या पिकास जास्त प्रमाणात मागणी असेल तर शेतमालाचे दर हे वाढतात असे बाजारपेठेचे सूत्रच आहे. कापसाच्या बाबतीत असे काही घडले होते त्यामुळे कापसाला मागील ५० वर्षातील सर्वात विक्रमी दर मिळाला होता. आता हळदीच्या बाबतीत देखील असेच काही घडत आहे. हळदीचा हंगाम सुरु झाला असून त्यास आता चांगला दर मिळत आहे. मात्र आता मार्च एप्रिल महिन्यात हळदीचे किती उत्पादन होते यावर हळदीचे दर अवलंबून आहे.

हे ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

हळदीचा सध्याचा दर

सांगली जिल्ह्यातील काही भागात हळद काढणीला सुरवात झाली आहे. यंदा पावसामुळे उत्पादनात घट झाली असून आता वाढीव दरातून का होईना भरपाई अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात हळदीची मोठ्याप्रमाणात विक्री होत असते. सध्या राजापुरी हळदीला ८ हजार रुपये तर पारपेठ हळदीला ७ हजार रुपये दर मिळत आहे.

हे ही वाचा (Read This ) IAS बनणारा झाला शेतकरी, संत्रीचे ३ एकरात घेतले ९ लाखाचे उत्पन्न

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *