मातीमधील कर्ब कमी का होते?
नमस्कार मंडळी,
थोडं लक्ष द्यावे लागेल माती मधला कर्ब कमी का होतो? मातीच्या आताच्या अवस्थेनुसार आपल्या मातीमध्ये कर्ब मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे.कमी कर्बाच कारण वर्तमान शेतीमध्ये रसायनचा वापर जसे केमिकल युक्त खते वापरण्याचा परीणाम त्याच बरोबर मातीमध्ये कुजणाऱे घटक कमी झाल्यामुळे जसे शेतामधला काडीकचरा होणारे प्रमाण, पिक फेरपालट न करणे , मातीची मशागत मोठ्या प्रमाणावर होणे शेती ओलिताखाली ठेवून वारंवार तेच ते पीक आणि जमिनीला आराम न देणे.
नैसर्गिक शेती मध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते.अशीच परिस्थिती जर राहीलं तर माती सुपिकतेच व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा असेल. आता आपल्याला सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
माती मधला सेंद्रिय कर्ब हा धोकादायक मोड वर आहे. यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा त्या मातीची उत्पादकता संपायला वेळ लागणार नाही हे तेवढेच शाश्वत सत्य आहे.
आपला शेतकरी करीत असलेल्या अशास्त्रीय व्यवस्थापनाने शेती मधला उत्पादन खर्च वाढला व त्याच प्रमाणे शेतीचे कालांतराने उत्पादन मात्र कमी कमी होत गेले आहे. यामुळे आज ची स्थिती अशी आहे की शेती हा व्यवसाय न परवडणारा असा वाटत आहे. म्हणुन शेती मधला कर्ब वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती, शेतीतील हिरवा कींवा वाळलेलं गवत याला कंपोस्ट करणे पिकामधले तणे शेतीतच वापर करणे या बाबींकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजेत..
धन्यवाद
Mission agriculture soil information
मिलिंद जि गोदे
9423361185