सोयाबीनच्या दरात हलकी वाढ, ९ हजार कधी जाणार यावर शेतकऱ्यांचे लक्ष

Shares

मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होतांना दिसत आहे. तर गेल्या १५ दिवसापासून सोयाबीनचे दर हे ७ हजर २५० वर स्थिर झाले आहे. आता सोयाबीनच्या दरात वाढ होणार की असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सोयाबीनचे दर वाढून पुन्हा घटल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. विक्री केली तर मध्यंतरीच्या तुलनेत क्विंटलमागे ४०० रुपये नुकसान सहन करावे लागणार आहे. तर विक्री केली अन् भविष्यात दर वाढले तर. या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. त्यामुळे दरात किंचित सुधारणा झाली आहे. सोयाबीनची १८ हजार पोत्यांची आवक होतांना दिसून येत आहे.

हे ही वाचा (Read This ) सोयाबीन पिकाला पर्यायी पीक ? ८० दिवसात मिळणार उत्पन्न

सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा प्रश्नात ?

आतापर्यंत वाढीव दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. शिवाय जानेवारी महिन्यात यंदाच्या हंगामातील विक्रमी म्हणजेच ७ हजार ६०० असा दरही मिळाला होता. परंतु शेतकऱ्यांना यापेक्षा दर वाढतील अशी अपेक्षा होती. पण आता दर स्थिरावले आहेत. त्यामुळे आहे त्याच दरात विक्री करावी की अजून वाढीव दराची वाट पहावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

उन्हाळी सोयाबीन उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ व्हावी तसेच खरिपात त्यांना बियाण्याची कमतरता भासू नये यासाठी उन्हाळी सोयाबीनची मोठ्याप्रमाणात लागवड व्हावी म्हणून कृषी विभागाला विशेष लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या.

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

सध्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून सोयाबीनची लागवड केली आहे. हवामान बदलामुळे या पिकाला पाहिजे तशी फुले येत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.

सध्या ४४९ हेक्टर शेतजमिनीवर उन्हाळी सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. असे असले तरी आठही तालुक्यात या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात फुले येत नसल्याची तक्रार सध्या शेतकरी करीत आहेत.

हरभरा आणि तूर

सध्या तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. खुल्या बाजारपेठेत ६ हजार ४५० तर खरेदी केंद्रावर ६ हजार ३०० असा दर ठरवून देण्यात आला आहे. तर हरभऱ्याची दिवसाकाठी २२ ते २५ हजार पोत्यांची आवक होत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *