शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळणार ८०% टक्क्यापर्यंत अनुदान – कृषिमंत्री भुसे
राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजना ( Subsidy Scheme) राबवत असते. राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक तसेच तुषार सिंचन संच यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन (Irrigation) योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेसंदर्भात ६ जानेवारी २०२२ ला एक शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील सूक्ष्म सिंचन (Sinchan) संच बसवलेल्या शेतकऱ्यांना पूरक असे अनुदान मिळावेत यासाठी राज्य शासनाकडून (State Government) २०० रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
या योजनेअंर्गत किती अनुदान मिळते ?
या योजनेअंतर्गत अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ५५ % तर इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ४५% अनुदान हे ५ हेक्टर क्षेत्राकरिता देण्यात येते. या योजनेसाठी केंद्रशासन ६० % तर राज्य शासन ४० % निधी उपलब्ध करून देते.
हे ही वाचा (Read This) शेतकरी या व्यवसायातून वर्षभर कमवू शकतात, सरकारही करणार मदत.
आता किती पूरक अनुदान मिळेल ?
१८ नोव्हेंबर २०२१ रोजी शासनाने मुख्यमंत्री श्वाश्वत सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण अनुदान देण्याचा निणर्य घेण्यात आला. प्रधानमंत्री कृषी (Agriculture) सिंचन योजनेअंतर्गत अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५% अनुदान व्यतिरिक्त २५% पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ४५% अनुदान याव्यतिरिक्त ३०% टक्के पूरक अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असून सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण ७५% व ८०% पर्यंत अनुदान मिळणार आहे. पूरक अनुदान देण्यासाठी लागणारा आर्थिक भार राज्य शासन उचलणारन असून सूक्ष्म सिंचन संच बसवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे.
कृषी मंत्री दादा भुसे काय म्हणाले ?
या पूरक अनुदान निधीतून सन २०२१-२२ या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. ७५% ते ८०% अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये बचत होणार आहे.
यामुळे अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.