पीएम किसान योजनेचा पुढचा हफ्ता १ जानेवारीपासून ?
सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहे. एवढेच काय तर शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, कार्यक्रम राबवले आहेत. यांपैकी पीएम किसान सम्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वर्षाला दिले जाते. हे ६ हजार रुपये २ हजार प्रमाणे ३ हफ्त्यात खात्यात जमा केले जाते. आता लवकरच शेतकऱ्यांना त्यांचा १० वा हफ्ता भेटणार आहे. हा दहावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र या दहाव्या हफ्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे.
कधी मिळणार दहावा हफ्ता ?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १० वा हफ्ता १ जानेवारी २०२२ ला पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री तोमर यांनी सांगितले आहे.
कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे?
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा दहावा हफ्ता हवा असेल तर त्यांना ई- केवायसी करणे अनिवार्य आहे. ई- केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे .परंतु संकेतस्थळावर जाऊन देखील ई- केवायसी होत नाहीये. शेतकऱ्यांना पोर्टल लॉगिन करतांना इनव्हॅलिड कोड येत आहे. या सर्व तांत्रिक अडचणी लवकरच सोडवण्यात येतील अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.