२७ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता , अलर्ट जारी

Shares

अवकाळी पावसानंतर आता कुठे हंगामी पिकांसाठी अनुकूल वातावरण झाले होते. मात्र भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने राज्यात २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. मध्य भारतावर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स ( WD ) चा प्रभाव पडण्याची अत्यंत दाट शक्यता दर्शवली जात आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार थंडी पडली आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. पिकांची चांगली वाढ होत असून थंडीचा पिकांना फायदा झाला आहे.

कुठे पाऊस पडण्याची शक्यता ?
हवामान खात्याने २७ ते २९ डिसेंबरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. २८ डिसेंबर ला औरंगाबाद, जळगाव, परभणी, हिंगोली, जालना, यवतमाळ, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर , गोंदिया जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता दर्शवली आहे. २७ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ डिसेंबर ला चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी, गोंदिया जिल्ह्यात पाऊस पडू शकतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *