इतर बातम्यापिकपाणी

एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

Shares

शेतकऱ्यांचा कल हा आता पारंपरिक पिकांपेक्षा हंगामी तसेच औषधी पिकांकडे जास्त आहे. तर कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार ठप्प पडले होते. त्यामुळे आता त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागली आहे. तर कित्तेक जण अजूनही उत्तम नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात आहेत.

तुमच्याकडे १ एकर शेतजमीन जरी असेल तरी तुम्ही या पिकाची लागवड करून लाखों रुपये कमवू शकता. तुमच्याकडे शेतजमीन नसेल तर तुम्ही करार करून शेतजमीन घेऊ शकता.

हे ही वाचा (Read This ) या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

या औषधी पिकाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत असून पुढे अजून याच्या मागणीत वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. याचे कारण म्हणजे ही औषधी वनस्पती डायबेटिस रोगावर अत्यंत प्रभावशाली ठरते. ही वनस्पती म्हणजे स्टीव्हिया. चला तर जाणून घेऊयात स्टीव्हिया लागवडीची संपूर्ण माहिती.

ही वनस्पती साखरेपेक्षा २५ ते ३० पट जास्त गोड असते. स्टीव्हिया मधुमेहाच्या रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. तर अधिक काळ टिकणाऱ्या वनस्पतींपैकी एक ही आहे. भारतामध्ये पुणे, बंगलोर, इंदोर, रायपूर आदी ठिकाणी लागवड केली जाते तर जगात कोरिया,जपान,अमेरिका इथे जास्त प्रमाणात लागवड केली जाते.

हे ही वाचा (Read This ) ५० हजारात सुरु करा हा व्यवसाय, कमवा ५ लाख रुपये, सरकार देणार ४०% अनुदान

लागवड माहिती

  • भारतामध्ये स्टीव्हियाची शेती बाराही महिने करता येते.
  • स्टीव्हियाच्या लागवडीसाठी अर्ध-आर्द्र आणि अर्ध-उबदार हवामान सर्वोत्तम मानले जाते.
  • ज्या भागात तापमान शून्य अंशाच्या खाली जाते त्या ठिकाणी त्याची लागवड करता येत नाही.
  • स्टीव्हियाच्या चांगल्या उत्पादनासाठी, ६ ph ते ७ ph दरम्यान चिकणमाती माती असावी.
  • दर १० दिवसांनी याचे सिंचन करावे लागते.
  • एका वर्षात ३ ते ४ वेळा याची कापणी करता येते.
  • कापणीनंतर साधारणतः ६० ते ९० क्विंटल पर्यंत वाळलेले पत्ते मिळतात.
  • स्टीव्हिया वनस्पती ६० ते ७० सेमी पर्यंत वाढते.
  • स्टीव्हिया ही एक दीर्घकाळ टिकणारी वनस्पती आहे.

स्टीव्हिया लागवडीसाठी लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न

एका एकरात स्टीव्हिया पिकाचे ४०,००० रोपे लावली तर सुमारे १ लाखा रुपयापर्यंत खर्च येतो. या पिकापासून ६ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. कमी जागेत देखील या पिकाची लागवड करून पाच पटीने जास्त नफा मिळवू शकतो.
स्टीव्हियाच्या एका रोपाची किंमत ही १२० ते १४० रुपये आहे. त्यामुळे तुम्ही एका एकरात याची लागवड केल्यास तुम्ही सहजच ६ लाख रुपये कमवू शकता.

स्टीव्हिया वनस्पतीची वाढती मागणी पाहता या पिकाची लागवड करणे फायद्याचे ठरते. एखादया कंपनीशी करार करून त्यांना या पिकाचा पुरवठा करता येतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *