इतर बातम्याबाजार भाव

कांद्याचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे दर

Shares

कांदा हे ऊस पिकानंतरचे महत्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रात कांदयाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेतकरी पराकाष्टा करून कांदा पिकवतो मात्र एका रात्रीतून शेतकऱ्याची मेहनत आणि सर्वकाही मातीमोल ठरत आहे. याचे कारण म्हणजे रात्रीतून कांद्याचे घसरते दर.

हंगामाच्या सुरुवातीला आणि साठवणूकीतला कांदा संपल्यावर कांद्याला विक्रमी भाव मिळाला. दीड महिन्यापूर्वी प्रतिक्विंटल ३ हजार ३०० रुपये भाव होता तर तो भाव आता ९०० रुपयांवर येऊन ठेपला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो अधिक उत्पादनासाठी जाणून घ्या या ६ महत्वाच्या टिप्स

कांद्याचे आजचे दर

onion rate

हे ही वाचा (Read This )  उन्हाळ्यात घ्या खास काळजी, करा या पदार्थांचे सेवन राहाल थंड

पैशांचा काहीही ताळमेळ नाही

शेतकरी दिवसरात्र एक करून शेती करतात. त्यात नैसर्गिक संकटांचा सामना करत कसे बसे पीक उभे करतात. यंदा तर बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी अधिकच खर्च झाला आहे. त्यात पिकास योग्य असा दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. चार महिन्यांचा उत्पादन खर्च आणि आता काढणीच्या दरम्यानचे दर याचा कुठेच मेळ लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे ही वाचा (Read This ) ५० हजारात सुरु करा हा व्यवसाय, कमवा ५ लाख रुपये, सरकार देणार ४०% अनुदान

उन्हाळी कांद्याचे क्षेत्र वाढले

यंदाच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी पीकपद्धती पूर्णपणे बदलली होती. पारंपारिक पिकांची जागा कडधान्यांनी घेतली आणि उन्हाळ्यात सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढ झाली होती. उन्हाळी कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. याशिवाय उन्हाळी कांदा काढणीपर्यंत कांद्याचे दर स्थिर होते. मात्र मागणी घटल्याने कांद्याचे दर घसरले आहेत.

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

कांद्याची साठवणूक करण्यास सुरुवात?

मध्यंतरीची अवकाळी आणि वाढते ऊन यामुळे काढलेल्या कांद्याला देखील धोका निर्माण झाला आहे. कांदा हा नाशवंत आहे. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

महिन्याभरात चारपटीने दर घसरले असल्याने आता वाहतूकीचा खर्चही शेतकऱ्यांना परवड नाही. त्यामुळे कांद्याचे संरक्षण आणि भविष्यातील योग्य दर मिळावा या अनुशंगाने कांद्याची साठवणूक केली जात आहे. मात्र कांदा साठवणूक करतांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. जेणेकरून कांदा खराब होणार नाही.

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *