थकबाकी मुक्त होण्यासाठी शेवटचे ७ दिवस, ३१ मार्च शेवटची तारीख

Shares

महाराष्ट्र मध्ये कृषी पंप थकबाकी हा महावितरण पुढील फार मोठा प्रश्न आहे.यासाठी महावितरणनेकृषी पंप विज जोडणी धोरण जाहीर केले. अनेक शेतकऱ्यांची कृषिपंपाची थकबाकी वाढत असल्यामुळे महावितरणाने वीज खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र कृषीपंपाची थकबाकी तसेच त्यावरील व्याज यामध्ये सवलत देत १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ करण्यात आले. त्याची मुदत आता ३१ मार्चला संपणार असूनया योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.

हे ही वाचा (Read This ) रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन स्वतःला थकबाकी मुक्त केले आहे. जर या योजनेमध्ये सातारा जिल्ह्याचा विचार केला तर हजार पेक्षा जास्त शेतकरी थकबाकी मुक्त झाले आहेत.
नांदेड परिमंडळामध्ये हिंगोली, परभणी जिल्ह्यांचा समावेश होत असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनेमध्ये आवर्जून सहभाग राहिला आहे.

हे ही वाचा (Read This ) या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

वसूल केलेल्या थकबाकी मधून पायाभूत सुविधा

महावितरणकडून राबवण्यात आलेल्या कृषी ऊर्जा अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वसूल करण्यात येणाऱ्या थकबाकीचा वापर त्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार आहे.

नांदेड परिमंडळामध्ये ९६ कोटी ६४ हजार रुपये थकबाकीचा भरणा करण्यात आला आहे.
या योजनेमध्ये तुम्ही ३१ मार्च पर्यंतच सहभाग नोंदवू शकता.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

थकबाकीदारांसाठी हीच सुवर्ण संधी

थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीज बिल तसेच मार्च २०२२ पर्यंतच्या थकबाकीचा ५० टक्के भरणा केला तर त्यामध्येही ५० टक्के सवलत ही मिळणार आहे.
त्यामुळे राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी तर या योजनेचा लाभ घेतला तर १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये हे माफ होणार आहेत. या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला भाग

सातारा जिल्ह्यामध्ये एक लाख ८३ हजार ९७३ शेतकरी हे थकबाकीदार होते. या शेतकऱ्यांकडे तब्बल ७७७ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी होती. या एकूण थकबाकी मध्ये महावितरणकडून निर्लेखन, थकबाकी वरील व्याज व दंड माफी आणि वीज बिले दुरुस्ती अशाप्रकारच्या समा योजनेतून शेतकऱ्यांकडे आता सुधारित ६३९ कोटी ६४ लाख रुपयांची थकबाकी आहे.

या एकूण थकबाकी मधील ५० टक्के रक्कम जर भरले तर उर्वरित ५० टक्के म्हणजेच ३०९ कोटी ८२ लाख रुपये माफ होणार आहेत व शेतकऱ्यांचे वीजबिल देखील संपूर्णपणे कोरे होणार आहे. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला असून283 कोटी 98 लाख रुपयांचा थकबाकीचा भरणा केला आहे.

नांदेड परिमंडळातील शेतकऱ्यांना या योजनेचे महत्व कळल्यामुळे तब्बल ३ हजार शेतकरी थकबाकी मुक्त झालेत. या योजनेत नांदेड परिमंडळातील १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
त्यांना चालू वीज बिल आणि मार्च २०२२ पर्यंतचे सुधारित थकबाकीपैकी केवळ अर्धी रक्कम म्हणजेच ५० % रक्कमच अदा करावी लागणार आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *