सोयाबीन वळले ८ हजारांच्या दिशेने, जाणून घ्या आजचे दर

Shares

अगदी सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार होतानाचे चित्र आपण पहिले आहे. या चढ उतारीमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती.

मागील १५ दिवसांपासून सोयाबीनचे दर हे ७ हजार २०० वर स्थिर होते. आता पाडव्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सोयाबीनला ७ हजार ३५० असा दर मिळत आहे. तर २५ हजार पोत्यांची आवक सुरु आहे.

हे ही वाचा (Read This ) ५० हजारात सुरु करा हा व्यवसाय, कमवा ५ लाख रुपये, सरकार देणार ४०% अनुदान

सोयाबीनचे आजचे दर

soybean price

मागील ३ ते ४ दिवसांपासून सोयाबीन दिवसाकाठी ५० ते १०० रुपयांनी वाढत आहे. त्यामुळेच ७ हजार २०० वर आलेले सोयाबीन आता पुन्हा ७ हजार ३५० वर य़ेऊन ठेपले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती त्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे

‘मौका मिलतेही चौका’ मारावा लागेल

सोयाबीनच्या चढ उतारीमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती. मात्र आता शेतकऱ्यांनी जास्त काळ साठवणूक न करता दरात वाढ होताच सोयाबीनची विक्री करावी जेणेकरून इतक्या दिवसापासून सोयाबीन साठवून ठेवण्याचा फायदा होईल.

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही दिवसांनी पुन्हा उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु होणार आहे. यंदा केवळ बियाणापुरते नाही तर उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला होता. हे सोयाबीन जोमात असून लवकरच याची आवक सुरु होणार आहे.
त्यामुळे खरिपातील साठवलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी आता विकले तर फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी अग्रवाल यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा (Read This )  उन्हाळ्यात घ्या खास काळजी, करा या पदार्थांचे सेवन राहाल थंड

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *