बाजार भाव

कांद्याचे भाव : शेतकऱ्यांचा इशारा – परिस्थिती न सुधारल्यास कांद्याचे भाव 200 रुपये किलोपर्यंत जाणार ?

Shares

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, पाच वर्षांपूर्वीही कांद्याला १० रुपये किलोपेक्षा कमी भाव मिळत होता आणि आजही तोच दर मिळत आहे. तर उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.

अनेक दिवसांपासून अडचणीत असलेल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही प्रमुख मंडईंमध्ये कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे . मात्र तरीही खर्च भरून काढण्यासाठी पुरेसा भाव मिळत नाही. केवळ एक ते पाच-सहा रुपये किलोने कांदा विकला जात राहिल्यास शेतकरी त्याची लागवड सोडून इतर पिके घेतील आणि ग्राहकांसाठी तो अत्यंत जीवघेणा ठरेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, महाराष्ट्रातील उत्पादन कमी झाल्यास देशात कांदा आयात करावा लागेल. त्याच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे आणि ती 200 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे कांद्याच्या उत्पादन खर्चानुसार सरकारने त्याच्या भावाबाबत लवकरात लवकर महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी समस्या सोडवणाऱ्या सेन्सरचा होत आहे मोठा फायदा

महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक आहे. देशातील सुमारे ४० टक्के कांद्याचे उत्पादन येथे होते. नाशिकच्या लासलगाव येथे आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. जिथे १ जून रोजी कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली होती. येथे किमान भाव 601 रुपये प्रतिक्विंटल होता. तर कमाल 1408 रुपये तर सरासरी दर 1051 रुपये प्रतिक्विंटल होता. तसेच निफाडमध्ये किमान भाव 450 रुपये होता. येथे कमाल दर 1201 तर सरासरी भाव 1071 रुपये प्रतिक्विंटल होता.

ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !

जिथे सर्वात जास्त भाव आहे, तिथे काय स्थिती आहे?

इतर मंडईंच्या तुलनेत पिंपळगावात कांद्याचे भाव जास्त आहेत. कारण येथील कांद्याचा दर्जा वेगळा आहे. येथे 1 जून रोजी किमान भाव 600 रुपये प्रतिक्विंटल होता. तर कमाल भाव 1611 रुपये तर सरासरी दर 1250 रुपये प्रतिक्विंटल होता. सायखेडा मंडईत किमान भाव 500 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 1301 रुपये तर सरासरी दर 1100 रुपये प्रतिक्विंटल होता.

kanda bhav

कांद्याला पाच वर्षांपूर्वी जसा भाव मिळत होता, तसाच भाव मिळत आहे

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, पाच वर्षांपूर्वीही शेतकर्‍यांना कांद्याला 10 रुपये किलोपेक्षा कमी भाव मिळत होता आणि आजही तोच दर मिळत आहे. तर उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. शेतमालाला भाव मिळू लागला की, सरकार तो कमी करण्याचा प्रयत्न करू लागते, पण आता फक्त ५० पैसे, ७५ पैसे, १ रुपया आणि २-३ रुपये किलो भाव मिळत असताना, शेतकऱ्यांचे नुकसान कसं भरून निघेल. विचारायला कोणी येत नाही.

एका हेक्टरमध्ये ७६ क्विंटल गव्हाचे उत्पादन देणारं हे वाण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास उपयुक्त

कांद्याला किमान आधारभूत किमतीत आणावे

दरवर्षी हाच दर कायम राहिल्यावर शेतकरी कांद्याची शेती करणे बंद करतील, असे दिघोळे सांगतात. त्यामुळे उत्पादनात घट होईल. मग तेलबिया पिकांप्रमाणे कांदाही आयात करावा लागेल. मग त्याची किंमत किती असेल याचा अंदाज घ्या. तृणधान्य पिकांपेक्षा कांदा लागवडीमुळे जास्त लोकांना रोजगार मिळतो. अशा परिस्थितीत सरकारने कांदा लागवडीच्या खर्चात ५० टक्के नफा जोडून किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित करावी. अन्यथा अशा प्रकारे कांद्याचे उत्पादन घेणारे शेतकरी देशोधडीला लागतील.

राज्यात १ जुलै पासून प्लास्टिक बंदी ; राज्य सरकारचा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *